मुंबई, 4 मे : आयपीएल 2023 मध्ये झालेल्या 46 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर 6 विकेट्सने विजय मिळवून वानखेडेवर काही दिवसांपूर्वी पंजाबकडून मिळालेल्या पराभवाचा बदला घेतला. परंतु यासामन्यानंतर दोन्ही संघ ट्विटरवरून एकमेकांची मस्करी करताना दिसले. अशातच पंजाबने कर्णधार रोहित शर्माच्या डक आउट होण्यावरून त्याची खिल्ली उडवली. यावर आता मुंबई इंडियन्सने चोख प्रतिउत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.
मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या होम ग्राउंडवर बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई समोर 20 ओव्हरमध्ये विजयासाठी 215 धावांचे आव्हान दिले. तेव्हा रोहित शर्मा वगळता मुंबईच्या सर्व फलंदाजांनी मैदानावर तुफान फटकेबाजी करून हे विजयासाठीचे लक्ष पूर्ण केले, यासोबतच मुंबईने पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर झेप घेतली.
IPL 2023 : ‘दिल्लीतून पळून गेलेले भगोडे….’ विराट सोबतच्या राड्यानंतर गौतम गंभीरच वादग्रस्त ट्विट
वानखेडेववरील मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने गोलंदाज अर्शदीपने केलेल्या स्टंप तोड कामगिरीमुळे सामना जिंकला होता. यावेळी पंजाबने मुंबई इंडिअन्सची खिल्ली उडवत ट्विट केले होते. यानंतर कालच्या सामन्यात मुंबईने पंजाबच्या होम ग्राउंडवर पंजाब किंग्सला पराभूत केल्यानंतर पंजाबने केलेला अपमान लक्षात ठेऊन पंजाब किंग्ससाठी एक ट्विट केले.
मुंबई इंडियन्सने केलेले हे ट्विट पाहून पंजाब किंग्सने थेट मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला टार्गेट करून तो डक आउट झाल्याबद्दल त्याची खिल्ली उडवली. तेव्हा मुंबई इंडियन्सने देखील पंजाब किंग्सला त्यांची जागा दाखवत “रोहित शर्माने 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत, तर पंजाब किंग्सने एकही ट्रॉफी जिंकली नाही अशा अर्थाचे ट्विट करत त्यांची लाज काढली. अखेर पंजाब किंग्सने काही वेळाने रोहितसाठी लिहिलेले ट्विट डिलीट केले.
सध्या पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणारे ट्विटर वॉर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.