लुधियाना, 30 एप्रिल : पंजाबमध्ये गॅस गळीतीमुळे दुर्घटना घडली असून ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गॅस गळती झाल्यानंतर १० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गॅस गळती झालेला परिसर सील करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लुधियानातील ग्यासपूरा भागात गॅस गळतीची घटना घडलीय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. याशिवाय रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. गॅस गळती कुठून झाली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.