दिल्ली, 21 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी जपानमध्ये हिरोशिमात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यानंतर आता मोदी पापुआ न्यू गिनी इथं पोहोचत आहेत. यासाठी पापुआ न्यू गिनीचे सरकार त्यांची परंपरा मोडून पंतप्रधान मोदींचे स्वागत करणार आहे.
पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचल्यावर त्यांच्या स्वागताला येतील. प्रशांत महासागरात असलेला हे देश रात्रीच्या वेळी परदेशी पाहुण्यांचे स्वागत करत नाही. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी ही परंपरा मागे ठेवून जेम्स मरापे स्वागताला येणार आहेत.
पंतप्रधान मोदींसाठी पापुआ न्यू गिनी सरकारने एक अपवाद म्हणून स्वागत करण्याचा निर्णय घेतलाय. सूर्यास्त झाल्यानंतर पापुआ न्यू गिनीमध्ये कोणताही परदेशी पाहुणा आला तरी सरकारकडून स्वागत केलं जात नाही. ही परंपरा आता पंतप्रधान मोदींसाठी मोडली जाणार आहे.
हिरोशिमात जी७ आणि क्वाड बैठकीत भाग घेण्यासाठी जपान दौऱ्यावर आहेत. यानंतर मोदी पापुआ न्यू गिनीला जाणार आहेत. तिथे रात्री उशिरा ते पोहोचतील. पंतप्रधान मोदी दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी हे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तर सोमवारी फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशनच्या तिसऱ्या शिखर संमेलनाचे सहअध्यक्ष पद भूषवतील.
या संमेलनात १४ द्विप देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. अशी बैठक आतापर्यंत फक्त अमेरिका आणि चीनने घेतली होती. पण चीनसोबत २०१५ पासून प्रशांत महासागरातील द्विप देशांनी बैठक केलेली नाही. पंतप्रधान मोदींसोबत या देशांची ही तिसरी बैठक असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.