Nagpur : नाना पटोले साहेब, आपण देशातील एका जुन्या व मोठ्या पक्षाचे महत्वाच्या प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष आहात. पण तुमच्या मागील काही दिवसांतील वक्तव्ये जी समाजमाध्यमांवर येतायत. त्याने आपल्याला आपल्याच सहकाऱ्यांवर विश्वास नसल्याचे चित्र उभ्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना वाटत आहे. हो आहेत पक्षातील नेत्यांमध्ये आपापसात मतभेद, पण आजवर कोणी असं समोर बोलून याचा गाजावाजा नव्हता केला. तुमच्या अश्या या वर्तणूक आणि दुही निर्माण करणाऱ्या वक्तव्यामुळे राज्यातील तमाम कार्यकर्त्यांमध्ये शंकेची पाल चुकचुकत आहे. असं वाटतंय की, नानाभाऊ पक्ष वाढवायच्या ऐवजी संपवायला निघाले आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी तातडीने ह्यावर लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा ह्या पक्षाचे अस्तित्व संपण्यास फार दिवस लागणार नाही.