रांची, 15 एप्रिल : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्येच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे घटना –
झारखंडची राजधानी रांचीला लागून असलेल्या बुंडूच्या लापुंग पोलीस स्टेशन हद्दीतील सारंगलोया गावात ही धक्कादायक घटना घडली. येथील अमृत होरो याने आपल्या पत्नीला तिचा प्रियकर नामजान बारलासह आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडले. यावेळी रागाच्या भरात पतीने पत्नीचा प्रियकर नामजान बारला याचा घरात ठेवलेल्या धारदार शस्त्राने वार करून खून केला. यानंतर आरोपी पतीने तेथून पळ काढला.
दुसरीकडे सारंगलोया गावातील ग्रामस्थांनी रक्ताने माखलेला मृतदेह पाहिल्यानंतर तत्काळ लापुंग पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी 30 वर्षीय नामजय होरोच्या रुपात मृताची ओळख पटली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून खुनात वापरलेले शस्त्र आणि कपडेही जप्त केले आहे. यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत श्वानपथकाच्या मदतीने खून करणाऱ्या अमृत होरो या आरोपीला गावातीलच एका घरातून अटक केली.
खुनाचा आरोपी अमृत होरो याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. चौकशीदरम्यान हत्येचा आरोपी अमृत होरो याने सांगितले की, नामजन बालाचे त्याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. अनेकदा तो त्याच्या गैरहजेरीत त्याच्या घरी जायचा. पत्नीच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला याबाबत ताकीद दिली होती. तरीही नामजान याने हे प्रेमसंबंध संपवले नाहीत.
त्याच दरम्यान पत्नीला प्रियकराच्या मिठीत पाहून त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी लापुंग पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली असून पुढील तपास सुरू आहे. तर या घटनेनंतर संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.