सुशिल कौशिक (ग्वाल्हेर), 21 एप्रिल : पती, पत्नीच्या भांडणातून मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 21 वर्षीय नवविवाहित पत्नीने आपल्या पतीवर अनैसर्गिक कृत्य करत जबर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पतीच्या या कृत्याला कंटाळून महिलेने पोलिसात धाव घेतली. त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पीडित तरुणी राजस्थानमधील ढोलपूरची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय विवाहित महिला 19 एप्रिलच्या रात्री अचानक हजीरा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्ये करत आहे. तिने अनेकवेळा याला विरोध केला, पण पती ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. उलट त्याने तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावरून पतीविरुद्ध अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
वकिलाचा कोट घालून आला आणि महिलेवर झाडल्या 3 गोळ्या, दिल्लीच्या साकेत कोर्टातला LIVE VIDEO
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजीरा पोलीस स्टेशन हद्दीतील गंगा विहार कॉलनीत राहणाऱ्या तरुणासोबत या तरुणीचा विवाह गेल्या वर्षी 1 जून रोजी झाला होता. ही महिला मूळची राजस्थानमधील ढोलपूरची आहे. नवविवाहित महिलेच्या म्हणण्यानुसार, संसाराला सुरुवात झाल्यानंतर दोन-तीन महिने सर्वकाही सुरळीत होते. त्यानंतर पती नशेत घरी येऊ लागला. तो तिला अनैसर्गिक पद्धतीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडू लागला. पत्नीने आपल्या आईकडे तक्रार दिली होती. परंतु पतीवर कोणताही परिणाम झाला नाही.
यानंतर मुलीची आई सासरच्या घरी येत समजावून गेली परंतु सासूनलाच उलटे बोलून तिला हाकलण्यात आले होते. यावर 7 फेब्रुवारी रोजी तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने आरोपी पतीने सासरी नेले तो तिला तेथेच सोडून गायब झाला.
प्रेम करणे गुन्हा आहे का? प्रेयसीच्या घरच्यांनी प्रियकराला घरी बोलवलं अन्…
याबाबत नवविवाहित महिलेने पतीला फोन केला असता त्याने तिला सोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर 19 एप्रिल रोजी नवविवाहित महिलेने तिच्या आईसह हजिरा पोलिस ठाणे गाठून पतीविरुद्ध अनैसर्गिक कृत्य, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.