अखंड प्रताप सिंग (कानपूर), 14 मे : उत्तर प्रदेशच्या नागरी निवडणुकांचे निकाल काल झाला. विविध नगरपरिषद व नगराध्यक्ष झाले. जवळपास युपीत भाजपने बऱ्यापैकी यश मिळवल्याचे दिसत आहे. भाजपसोबत विविध आघाड्या, समाजवादी पार्टी, काँग्रेस यांनीही काही प्रमाणात यश मिळवल्याचे दिसत आहे. दरम्यान या सगळ्यात कानपूर महानगरपालिकेचे एक चित्र चर्चेचा विषय ठरला आहे. आमदारांच्या पत्नी निवडणुकीला राहिल्या होत्या परंतु ते अचानक रडू लागल्याने चर्चेचा विषय बनला होता. दरम्यान याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान या नेत्यांच्या पत्नीच्या पराभवाचे हे रडून नव्हते तर ते विजयाचे रडणे होते. हा व्हिडीओ बेगम पूर्वा येथील सपा नेते अकिल सानू यांचा आहे. कानपूरच्या प्रभाग 102 बेगम पूर्वा मधून सपा उमेदवार निशा यांच्या विजयावर त्यांचे पती अकिल सानू ढसाढसा रडू लागले.
कर्नाटक निकालानंतर महाराष्ट्रात घडामोडींना वेग; ठाकरे गटाची खलबतं
निशा यांना 2152 मते मिळाली यामध्ये त्या 471 मतांनी लीड घेत विजयी झाल्या. याप्रकरणी सपा नेते अकील यांना विजयाची बातमी समजताच ते ढसाढसा रडू लागले. त्यांची पत्नी नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.
दरम्यान याप्रकरणी अकील म्हणाले की, मागच्या काही वर्षांपासून तो पत्नी निवडून येण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. परंतु अखेर त्यांना यश मिळाल्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता यामुळे त्यांना आनंद आणि दु:ख झाल्याने त्यांना रडू आवरले नाही.
कोण होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री? सिद्धरामय्या की शिवकुमार? खरगेंनी सांगितली Inside स्टोरी
दरम्यान यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरव व्हायरल केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला. अकीलने सांगितले की अनेक भांडवलदारांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्यामुळे ते जिंकतील यावर विश्वास बसत नव्हता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.