मुंबई, 24 मार्च : बॉलिवूडचा शो म्हणजे अभिनेता राज कपूर. हिंदी सिनेमाला खऱ्या अर्थानं नाव देणारे एकमेव अभिनेते अशी त्यांची ओळख आहे. अभिनय, दिग्दर्शन अशा दोन्ही क्षेत्रात त्यांनी नाव कमावलं. अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेले सिनेमे कधीच विस्मरणात जाऊ शकत नाहीत. त्यांच्या याच कामातून आलेला एक हिट सिनेमा म्हणजे प्रेमरोग. आजही हा सिनेमा प्रेक्षक आवडीनं पाहतात. याच सिनेमाची जोडलेला एक किस्सा आज पाहणार आहोत. सिनेमात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. दोघांनी सिनेमात उत्तम कामही केलं. पण एक प्रसंग असा आला की पद्मिनी कोल्हापूरेला ऋषि कपूरला सनासन कानाखाली द्यावी लागली होती. पाहूया हा रंजक किस्सा.
प्रेमरोग या सिनेमात ऋषी कपूरनं देव हे पात्र साकारलं होतं पद्मिनी कोल्हापूरेनं विधवा मनोरमाचं पात्र साकारलं होतं. हा सिनेमा पूर्णपणे रोमँटिक सिनेमा होता. सिनेमाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. चित्रपट समीक्षकांनी देखील सिनेमाचं कौतुक केलं होतं.
हेही वाचा – अभिनेत्रीवर लागला होता नवऱ्याच्या खुनाच्या प्रयत्नाचा आरोप; करिअर झालं बर्बाद , आज आहे अशी परिस्थिती
राज कपूर यांचं दिग्दर्शनही त्यांच्या अभिनया इतकंच परफेक्ट असायचं. आपल्या सिनेमात कोणतीच कमी असू नये अशी त्यांची कायम इच्छा असायची. या सिनेमातील प्रत्येक सीन रिअलिस्टिक असावा अशी त्यांची इच्छा होती. पण ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे यांच्या एका सीनमध्ये राज यांना तो रिअलिस्टिकपणा कुठेच मिळत नव्हता. ते फार चिडले होते. त्यांनी पद्मिनी कोल्हापूरेला असं काही करायला सांगितलं की ज्यामुळे तिला काहीच वाटलं नाही पण बिचारे ऋषी कपूर यांना खूप त्रास सहन करावा लागला होता.
प्रेमरोग सिनेमात एका सीनमध्ये ऋषी कपूरला अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेनं खरोखर 8 वेळा साटकन कानाखाली मारल्या होत्या. पद्मिनी कोल्हापूरे यांनी एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता. त्यांनी म्हटलं होत, सिनेमात एक सीन होता ज्यात मला चिंटू म्हणजेच ऋषी कपूर यांच्या कानाखाली मारायची होती. पण नेहमी मी त्यांच्या कानाखाली मारायला जायचे आणि माझे हात त्यांच्या गालापाशी जाऊन थांबायचा. हे सारखं सारखं व्हायला लागलं आणि राज काका खूप वैतागले. त्यांना हा सीन अगदी रिअलिस्टिक हवा होता. ते माझ्यावर ओरडले आणि म्हणाले तू जोरात मार त्याला मला एकदम रिअलिस्टिक शॉर्ट हवा आहे.
हेही वाचा – ‘या 2 अभिनेत्यांनी दाखवली राज कुमारला त्याची जागा; अशी उतरवली होती अभिनेत्याची घमेंड
राज काकांचा राग बघून मी होती नव्हती सगळी हिंमत एकवटली आणि ऋषी कपूरच्या साटकन कानाखाली लगावली. या शॉर्टवेळी मी 7-8 वेळा ऋषी कपूरच्या कानाखाली मारली. इतक्या कानाखाली खाऊन ऋषी कपूर चांगलेच वैतागले होते आणि त्यानी याचा बदला घ्यायचा असं ठरवलं होतं. त्याचा एक गाल चांगलाच लालबुंद झाला होता.
पुढे ऋषी कपूर यांनी पद्मिनी कोल्हापूरेच्या हातानं खालेल्या माराचा बदला घेण्याचं ठरवलं आणि डायरेक्टरशी बोलून त्यांनी मुद्दाम तसा सीन अँड करून करून घेतला आणि कानाखाली खालेल्या 7-8 चापट्यांचा चांगलाच बदला घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.