रितेश कुमार (समस्तीपूर), 18 मे : सध्या शेती परवडत नसल्याने सुशिक्षित तरुण मुले शेतीकडे पाठ फिरवत आहेत. दरम्यान अस्मानी संकट आणि सरकारचे शेतीविषयक धोरण यामुळे तरूणांना शेती आव्हानात्मक काम वाटत आहे. दरम्यान बिहारमध्ये शेती पिकाचे योग्य नियोजन करून तरूणांनी नवी क्रांती घडवल्याने याची चर्चा जोरदार होत आहे. अनेक तरुणांनी तोट्यातील शेती नफ्यात आणली आहे. बिहारच्या गौपूर पंचायतीचे तरुण शेतकरी पपईची लागवड करून दरमहा सव्वा लाख रुपये कमवत आहेत.
ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तरूणांनी कृषी क्षेत्रात येण्यासाठी आपल्या भागातील स्थानिक शेतकऱ्यांकडून शेतीची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर कमी खर्चात चांगला नफा देणारी शेती YouTube च्या माध्यमातून पाहिली. यावेळी एका तरुण शेतकऱ्याला पपई लागवडीची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने पपईची लागवड सुरू केली. यामध्ये त्याला चांगला नफा मिळू लागला. सध्या हा तरूण पपईच्या लागवडीतून महिन्याला 1.25 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहे.
तरुण शेतकरी मुरली मनोहर सिंग हा म्हणाला की, 2019 मध्ये पहिल्यांदाच शेतात पपईची लागवड सुरू करण्यात आली. त्या काळात आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. पण आम्ही पुन्हा 2021 मध्ये पपईचे पीक लावले. त्या दरम्यानही फारसा फायदा झाला नाही.
सन 2022 मध्ये पपईची 500 रोपे लावली होती, यातून महिन्याला 1.25 लाख रुपये नफा होत गेला. यासोबतच तरुण शेतकऱ्यांनी पपईच्या शेतात मोकळ्या जागेत झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे. जे पपई पिकाच्या सुधारण्याबरोबरच नफाही देत असल्याची माहिती देण्यात आली.
जेव्हा आम्ही पपईची शेती सुरू केली आणि पपई पिकायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात फळे विकण्यासाठी बाजारात जावे लागले. मात्र त्या काळात बाजारात योग्य भाव न मिळाल्याने आम्हाला खूप त्रास व्हायचा. पण आता व्यापारी शेतात येतात. पिकलेली पपई स्वतःहून काढून घेत असल्याची माहिती त्यानी दिली.
वर्ध्यात सूर्य ओकतोय आग, पारा चाळीशी पार, आजचं तापमान पाहिलंत का?
याचबरोबर शेतात बाजारापेक्षा भाव जास्त आहे. बाजारात जाण्याचा खर्चही वाचतो. यासोबतच पपई बागायती ही व्यावसायिक शेती म्हणून ओळखली जाते, असे त्यांनी सांगितले. ज्यामुळे शेतकऱ्याला कमी खर्चात चांगला नफा मिळतो. याचाच परिणाम म्हणून आज तरुण शेतकरी मुरली मनोहर सिंग महिण्याला 1.30 लाख रुपये गुंतवून दरमहा 1.25 लाख रुपये कमवत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.