पुनीत माथूर (जोधपूर), 28 एप्रिल : प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला सरकारी नोकरी मिळावी. परंतु मेहनत आणि संघर्ष केल्याशिवाय सरकारी मिळत नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहोत की या व्यक्तीने देशसेवेसाठी लाखोंचे पॅकेजच नाही तर स्वत:चा स्टार्टअप बिझनेसही सोडला आहे. राजस्थानमधील अभिषेक सुराणा या आयएएस अधिकाऱ्याची ही कहाणी आहे. यांच्या यशाने अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आहे.
बेरोजगारीमुळे तरुण नोकरीच्या मागे धावत असताना आपण नेहमी पाहत आलो आहे. जोधपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सुराणा यांनी देशसेवेसाठी सिंगापूर, लंडन आदी देशांतील मोठ्या पॅकेजची नोकरी सोडून दिली आहे.
काय आहे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या यशाचं रहस्य? जे बदलेल तुमचं आयुष्य
अभिषेक सुराणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा देशासाठी केलेला त्याग नाही, ही माझी आवड आणि निवडही आहे, इतरांप्रमाणे मीही नोकरी आणि पॅकेजसाठी खूप मेहनत घेतली. यामध्ये मी यशही मिळवलं पण त्या नोकरीत समाधान न मिळाल्याने मला देशात परतावे लागले. निर्णय अवघड होता, पण आत्मविश्वास आणि चांगल्या विचारांमुळे या पायरीपर्यंत आल्याचे ते म्हणाले.
अभिषेक सुराणा यांनी UPSC मध्ये कठोर परिश्रम आणि समर्पणाने केलेल्या प्रयत्नात यश मिळाले आहे. 2017 मध्ये IFS आणि नंतर IPS साठी त्यांची निवड झाली. IPS चे प्रशिक्षण पूर्ण केले आणि UPSC मध्ये आणखी एक प्रयत्न केला आणि IAS मध्ये ऑल इंडिया रँक मिळवून 10 वा क्रमांक मिळवला. अभिषेक सुराणा हे शेतकरी कुटुंबातून आहेत. त्यांचे आजोबा शेतकरी होते, वडील लेक्चरर आहेत.
IAS अभिषेक सुराणा हे मूळचे भिलवाडा येथील रहिवासी आहेत. त्यांनी भिलवाडा स्कूलमधून 12वी केली त्यानंतर त्यानी IIT दिल्लीमध्ये B.Tech इलेक्ट्रॉनिक्स केले. यामध्ये त्यांनी UPSC चा अभ्यास सुरू ठेवला. 2017 मध्ये स्पर्धा परीक्षेत भारतीय वन सेवेत उत्तीर्ण झाले, त्यानंतर 2017 मध्ये ते आयपीएसमध्ये रुजू झाले.
अमेरिका, इंग्लंडच नाही तर ‘या’ देशातही आहेत करिअरच्या मोठ्या संधी; स्वस्तात होईल शिक्षण
2018 मध्ये, त्याची IAS मध्ये निवड झाली आणि त्याना भारतात 10 वा क्रमांक मिळाला. आणि ते पहिल्यांदा राजस्थानमध्ये रुजू झाले. अभिषेक सुराणा म्हणाले की, क्रीडा मैदानाची योजना प्रथम जिल्हा परिषदेने आणली. जोधपूर जिल्ह्यातील 300 ग्रामपंचायतींमध्ये क्रीडांगणांचे बांधकाम सुरू असून 312 ग्रामपंचायतींमध्ये काम तयार केले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.