हैदराबाद, 15 एप्रिल : आयपीएलचा १९ वा सामना शुक्रवारी रात्री केकेआर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झाला. केकेआरला हैदराबादने २३ धावांनी पराभूत करत यंदाच्या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. दरम्यान, पराभवानंतरही केकेआर आय़पीएल २०२३ च्या पॉइंट टेबलमध्ये टॉप ४ मध्ये आहे. तर सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स आणि आरसीबीला मागे टाकलंय. हैदराबादचे या विजयासह चार गुण झाले असून ते पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानी आहेत.
आयपीएल २०२३ च्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या चार संघांमध्ये राजस्थान रॉयल्स टॉपला आहे. राजस्थानचे सहा गुण आहेत. तर लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांचेही प्रत्येकी सहा गुण आहेत. मात्र धावगती कमी असल्याने ते अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या क्रमांकावर चार गुणांसर केकेआरचा क्रमांक लागतो.
IPL 2023 PBKS vs GT : ‘स्वत:साठी खेळाल तर क्रिकेट तुम्हाला’, शुभमन गिलची खेळी पाहून सेहवाग भडकला
सनरायजर्स हैदराबादने यंदाच्या हंगामातील पहिले दोन सामने गमावले होते. त्यानंतर संघाने पुनरागमन केलं आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्याआधी सनरायजर्सने पंजाब किंग्जविरुद्ध ८ विकेटने विजय मिळवला होता. आता पुढचा सामना जिंकून विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी सनरायजर्सचा संघ उत्सुक असेल.
केकेआरविरुद्ध सनरायजर्स हैदराबादच्या हॅरी ब्रूकने झंझावाती शतक केलं. या शतकाच्या जोरावर सनरायजर्सने २२८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात अडखळत झाली. कर्णधार नितीश राणाने ७५ धावा आणि रिंकु सिंहने नाबाद ५८ धावा केल्या. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.