मुंबई, 18 एप्रिल : आयपीएल 2023 स्पर्धेचा रोमांच दिवसागणिक वाढू लागला आहे. दररोज एकापेक्षाएक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत असून क्रिकेटर्समधील अनेक सुंदर प्रसंगांचे देखील चाहते साक्षीदार होत असतात. असाच एक सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यामध्ये देखील पारपडला. या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला परंतु विराट कोहलीने केलेल्या एका कृतीने सर्वांचं मन जिंकलं.
सोमवारी चिन्नस्वामी स्टेडियमवर यंदाच्या आयपीएल मधील 24 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात पारपडला. या सामन्यात चेन्नईने आरसीबीवर 8 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर मैदानात विराट कोहलीने एम एस धोनीची गळाभेट घेतली आणि बराच वेळ या दोघांमध्ये संवाद झाला. यानंतर विराटने धोनी सोबतच एक फोटो त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट केला.
विराट कोहलीने धोनी सोबत गळाभेट घेत असतानाचा फोटो ट्विट करत त्या फोटोला “❤️+💛= 🇮🇳 ” असे कॅप्शन दिले.
❤️+💛= 🇮🇳 @msdhoni pic.twitter.com/CU0ktK3cG7
— Virat Kohli (@imVkohli) April 18, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.