मुंबई, 12 मे : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तयारी सुरू झाली आहे. 13 मे रोजी दोघांचा साखरपुडा होणार आहे. दोघांच्या घरी साखरपुड्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात परिणीतीच्या घराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बालकनीमध्ये वेगवेगळ्या रंगाची रोषणाई सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार परिणीची बहिण म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील साखरपुड्याला हजेरी लावणार आहे. प्रियांका नुकतीच NMAC च्या उद्घाटनासाठी भारतात आली होती. त्यानंतर ती आता पुन्हा बहिणीच्या लग्नासाठी भारतात येणार आहे.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा कनॉट प्लेसच्या कपूरथला हाऊसमध्ये होणार आहे. दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडणार आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा यावेळी बहिणीच्या लग्नाला लेक मालतीला देखील घेऊन येणार आहे का याकडे सर्वांचं लक्ष आहे. साखरपुडा दिल्लीत होणार असल्याने प्रियांका लेकीसह दिल्लीत दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा – बहीण बनली सवत,शूटिंगमध्ये गमावला डोळा, घरात तीन दिवस मृत अवस्थेत पडलेल्या ललिता पवार
मीडिया रिपोर्टनुसार, प्रियांकाची यावेळचा भारत दौरा फार छोटा असणार आहे. ती तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून परिणीतीच्या साखरपुड्यासाठी येणार आहे. कामात बिझी असल्याने प्रियांका साखरपुड्याच्या काही तास पोहचू शकणार नाहीये. साखरपुडा होण्याच्या काही मिनिटं आधी ती पोहोचून दोघांना शुभेच्छा देऊन निघणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रियांका नवरा निक जोनस देखील साखरपुड्याला हजर राहू शकणार नाहीये असं सांगितलं जातंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.