मुंबई, 23 मे: नुकताच UPSC CSE 2022 परिकसेहच निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षप्रमाणे यंदाही टॉप दहा उमेदवारांच्या यादीमध्ये सहा मुली आहेत. इतकाच नाही तर पहिल्या तीन टॉपर्समध्येही मुलीच आहेत. बोर्डाची परीक्षा असो वा कोणतीही स्पर्धा परीक्षा बहुतांश वेळी मुलीच अशा परीक्षांमध्ये अव्वल ठरतात. पण असं का? मुलीच नेहमी सरस का ठरतात? कधी विचार केलाय? मुलींच्या तुलनेत बहुतांश मुलं नक्की कमी कुठे पडतात? याबाबत Organisation for Economic Co-operation and Development या संस्थेनं एक अभ्यास केला. या अभयसातून जे समोर आलं ते खरंच आश्चर्यचकित करणारं होतं.
म्हणून मुली अव्वल ठरत असाव्यात?
मुली करतात अधिक वाचन
एका सर्वेक्षणानुसार, मुलींमध्ये वाचनाची आवड जास्त असते तर अनेक मुलांना वाचायला अजिबात आवडत नाही. म्हणूनच मुलांपेक्षा मुलींना ज्ञान कमी असते. तसंच या सर्वेक्षणानुसार, अर्ध्यापेक्षा अधिक मुली दिवसभरातुन किमान अर्धा तास वाचन करतात. याउलट एक तृतीयांशपेक्षा कमी मुलं इतका वेळ वाचन करतात.
UPSC Result 2022: मोठी बातमी! UPSC परीक्षेचा निकाल जाहीर, इशिता किशोर देशात ठरली अव्वल
मुलींचा अटेन्शन स्पॅन चांगला
कॅनडातील न्यू ब्रंसविक विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॅनियल व्हॉयर आणि सुसान व्हॉयर यांनी अनेक भिन्न प्रकाशित अभ्यासांतील डेटा एकत्र करून मेटा-विश्लेषणकेलंय त्यात असं म्हंटलं आहे की, मुली शाळेतील वर्गांमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं लक्ष केंद्रित करू शकतात म्हणूनच त्या अभ्यासात आणि परीक्षेत अव्वल येतात. तर याउलट मुलं अधिक लक्ष केंद्रित करू शकत नाहीत म्हणून परीक्षेत कमी पडतात.
नक्की किती असतो एका IAS अधिकाऱ्याचा पगार? कोणत्या मिळतात सुविधा? A-Z माहिती
वाईट सवयी आणि ताण
संशोधकांना असंही आढळलं की मुलं त्यांचा मोकळा वेळ आभासी जगात घालवतात. ते दररोज मुलींच्या तुलने ऑनलाइन गेम खेळण्याची 17 टक्के अधिक शक्यता असते. ते इंटरनेटचा जास्त वापर करतात. तसंच त्यांना कुटूंबीयांकडून प्रोत्साहनही कमी मिळतं. याउलट मुली कुटुंबियांसह अधिक वेळ घालवतात. मुलींना कमी गुण मिळाले तर कुटूंबीयांकडून त्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.
एकूणच मुली या गोष्टीमुळे अव्वल असतात असं शास्त्रज्ञ म्हणतात. या बातमीतून मुलं किंवा मुली असा भेदभाव करण्याचा अजिबात हेतू नाही. मात्र योग्य तो अभ्यास केला आणि आपल्या पात्रतेनुसार अभयास केला तर कोणीही कुठेही कमी नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.