मुंबई, 04 मे : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या लाइमलाइटमध्ये आहे. सलमानच्या किसी का भाई किसी की जान या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये डेब्यू केलाय. पलकनं नुकत्याच एका मुलाखतीत आईच्या दुसऱ्या प्रेग्नंसी विषयी चर्चा केलीये. श्वेताने जेव्हा पलकला तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीबद्दल सांगितलं तेव्हा ती खूप शॉक झाली होती. तेव्हा श्वेतानं अभिनव कोहली बरोबर दुसरं लग्न केलं होतं आणि ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती. तेव्हा पलक केवळ 15 वर्षांची होती. तिने मुलीला प्रेग्नंसीविषयी सांगितलं आणि पलक है ऐकून हैराण झाली होती.
पलकने किसी का भाई किसी जान सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान एक मुलाखत दिली. तेव्हा बोलताना तिनं आईच्या दुसऱ्या प्रेग्नंसीवर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “मला आठवतंय मी तेव्हा 15 वर्षांचे होते. माझ्या आईने मला सांगितलं की ती आणखी एका मुलाला जन्म देणार आहे. हे ऐकून मी हैराण झाले होते. हे असं झालं होतं की आई आणि माझ्यात एखादं कॉन्ट्रक्ट आहे आणि त्यात मला धोका मिळाला आहे. माझ्या कॉन्ट्रक्टमध्ये अशा कोणत्या टर्म्सच नव्हत्या. मी गोष्ट स्वीकारूच शकत नव्हते. पण आईने माझ्या या वागण्यावर व्हाट डू मीन नो”, अशी प्रतिक्रिया दिली होती.
हेही वाचा – ‘मी लखनऊचा आहे, जिथे लोक ‘तू’ नाही ‘आप’ म्हणतात’; कंगनाच्या आरोपांवर जावेद अख्तरनी चांगलाच सुनावलं
पलक पुढे म्हणाली, “माझी आई माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की, तू कसला विचार करतेय. तेव्हा मी तिला म्हणाले की, मला कोणीच सांगितलं नाही की या घरात आणखी एक बाळ येणार आहे. मी अजून या गोष्टीसाठी तयार नाहीये. त्यावर माझ्या आईनं मला, ओव्हररिएक्ट करण बंद कर असं सांगितलं”.
पलकने मुलाखतीत बोलताना पुढे सांगितलं की, “मी त्यानंतर ठरवलं की आईबरोबर सोनाग्राफीसाठी जायचं. त्यावेळी माझे विचार अगदी बदलले. मी तेव्हा त्या बाळाला जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करू लागली. मला रडू आलं होतं. मी गोंधळून गेले. जेव्हा मी पहिल्यांदा आईबरोबर सोनोग्राफी सेंटरमध्ये गेले आणि पहिल्यांदा बाळाचा चेहरा पाहिला तो दिवस माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. मला आठवतंय की जेव्हा त्याचा पहिल्यांदा चेहरा पाहिला होता तेव्हा मी ढसाढसा रडले होते”.
अभिनेत्री श्वेता तिवारीने राजा चौधरीबरोबर पहिलं लग्न केलं. पलक ही राजा आणि श्वेता यांची मुलगी आहे. मुलीच्या जन्मानंतर दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. लेक मोठी झाल्यानंतर अनेक वर्षांनी पलकने अभिनव कोहलीबरोबर दुसरं लग्न केलं. अभिनव आणि पलक यांना एक मुलगा आहे. तेव्हा पलक तिच्या भावाच्या जन्मासाठी तयार नव्हती पण आता ती भावावर प्रचंड प्रेम करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.