पुणे, 9 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार तरुणांशी कायम संवाद साधतात. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र व्हिजन या युवाकेंद्रित उपक्रमानिमित्त रोहित पवार यांनी राज्यातील तरुणांशी संवाद साधला होता. या अंतर्गत रोहित पवार यांनी ट्विटर वर #AskRohitPawar या हॅशटॅगखाली कोणतेही प्रश्न विचारा असं म्हटलं आहे. यावर विविध स्तरातून लोक वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. एका तरुणीने माझ्या एका तरुणावर प्रेम असून त्याच्या घरच्यांचा लग्नाला विरोध आहे. आम्ही पळून जाऊ का? असा प्रश्न विचारला आहे. यावर रोहित पवार यांनाही तिला मोठ्या भावाच्या नात्याने सल्ला दिला आहे.
काय म्हणाली तरुणी?
तुमच्या शहरातून (पुणे)
कल्याणी नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा प्रश्न विचारण्यात आला आहे. “दादा माझे एका मुलावर खूप प्रेम आहे आम्ही दोघे लग्न पण करणार आहोत पण मुलाच्या घरचे आमच्या लग्नाला तयार होत नाहीत म्हणुन आम्ही दोघांनी पळून जायचा निर्णय घेतला आहे. तुमच्या मते मी काय करू..? असा प्रश्न तिने रोहित पवार यांना विचारला आहे.
पळून जाण्यासाठी आई-वडीलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसं नक्की करा!#AskRohitPawar https://t.co/JvWoooTM4c
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 9, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.