मुंबई, 05 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देऊन एकच धुरळा उडवून दिला. पवारांच्या या गुगलीमुळे पक्षात होणाऱ्या बंडखोरीला लगाम घातला अशी चर्चा रंगली आहे. पण, त्यांची अशी काही खेळी असेल याबद्दल मला कल्पना नाही, मी पवारांची लवकरच भेट घेणार आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली पण आज राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीने पवारांचा राजीनामा फेटाळला आहे. या निर्णयाबद्दल संजय राऊत यांनी समाधान व्यक्त केलं.
शरद पवार यांचा राजीनामा हा ठरवून केलेला आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता संजय राऊत म्हणाले की, ‘मला काही माहिती नाही, मी लवकरच शरद पवार यांना भेटणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
‘मुळात त्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीने जर प्रस्ताव फेटाळला असेल तर माझं मत आहे ते योग्य आहे. तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी याचा विरोधी पक्षाच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो. आम्ही सगळे एकत्र असलो तरी देशातील प्रमुख पक्षांचं या घडामोडीकडे लक्ष आहे’ असंही पवार म्हणाले.
‘राजीनामा फेटाळला हे अपेक्षित आहे, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय जरी असला तरी विरोधी पक्षाच्या राजकारणावर या घडामोडींमुळे परिणाम होऊ शकतो. देशातील सर्व पक्षांचे या घडामोडी कडे लक्ष आहे आणि राहणार आहे. आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत जशा विरोधी पक्षांनी आपल्या भावना पवार साहेबांना कळविल्या तशाच उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भावना शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत, असंही राऊत म्हणाले.
(Sharad pawar : राष्ट्रवादीच्या बैठकीतून मोठी बातमी, शरद पवारांनी घेतली नवी भूमिका)
राष्ट्रवादीकडे दुसरा समोर पर्याय नव्हता. हे योग्यच झालं आहे. हा पक्ष एक स्वतंत्र पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी देखील पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी बोलवून त्या संदर्भातील निर्णय घेतले गेले होते. महाबळेश्वरच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये आणि अधिवेशनात हे निर्णय घेण्यात आले होते, असंही राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.