मुंबई, 2 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूकंप घडवला आहे. पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. साहेब निर्णय मागे घ्या अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी सभागृहात सुरू असल्याचं चित्र आहे. शरद पवार यांनी निवृत्ती घोषणा करताच राष्ट्रवादीचे नेते भावूक झाले आहेत. जयंत पाटील यांना आपल्या भावना व्यक्त करताना आश्रू अनावर झाले. तर अजित पवार यांनाही गलबलून आलं.
नेते भावूक
शरद पवार यांनी निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करताच कार्यकर्ते भावनिक झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपल्या भावना व्यक्त करताना आश्रू अनावर झाले. अचानक पवारसाहेबांनी बाजू जाऊ नये, आम्हाला गरज आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या पायापडत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तर अजित पवार यांना देखील गलबलून आलं.
शरद पवारांनी नेमकं काय म्हटलं?
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, माझ्या खासदारकीचे तीन वर्ष राहिले आहेत. या खासदारकीनंतर आता आणखी नवी जबाबदारी नको. मला कळतं कुठं थांबायचं. पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असेल हे ज्येष्ठ नेत्यांनी ठरवावं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.