वैभव सोनवणे, प्रतिनिधी
पुणे, 5 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय अखेर अखेरीस मागे घेतला आहे. ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मंगळवारी (2 मे) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यानंतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सर्वजण करत होते. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपला निर्णय मागे घेतला. यावेळी आमदार रोहित पवार देखील सोबत होते. रोहित पवार पुण्यात आले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
तुमच्या शहरातून (पुणे)
मी एकटाच सावली सारखं होतं असं नाही, आता साहेबांनी जो निर्णय घेतला तो कसा घेतला साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. आज महाराष्ट्राच्या लोकांच्या इच्छेनुसार पवार साहेबांनी माघार घेऊन पुढे आले आहेत. आता लढायचं आणि कार्यकर्त्यांना घेऊन लढायचं आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत. नेहमीच त्यांच्या विचाराने चालणारी लोक आहोत. आपण जर बघितलं तर प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात तिथे असलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज साहेबांच्या बरोबर आहे. आज पुण्यामध्ये सुद्धा पवार साहेबांचा अतिशय प्रेमाने या सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आणि हीच खरी खरी पवार साहेबांची ताकत असल्याचं मत यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केलं.
वाचा – शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत गैरहजर असलेले अजितदादा आले समोर, म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांना पर्याय नाही अशी चर्चा सुरू होती. यावर रोहित पवार यांना विचारला असता ते म्हणाले की असं नाही काही लोकांनी लिहिलंय व्हाट्सअप केलंय आणि काही लोक उगाच चर्चा करत आहे. आपण जर पाहिलं तर कमिटीमध्ये सर्वच लोक होते आणि कमिटीमध्ये एका आवाजामध्ये एका निर्णयाने पवार साहेबांनी माघार घ्यावी असं निर्णय तिथे झाला आहे. त्यामुळे अश्या अफवांवर खूप विश्वास ठेवून हे योग्य नाही, असं यावेळी पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आज पवारांबरोबर पत्रकार परिषदेत उपस्थित नसल्याने पुन्हा एकदा अजित पवार यांची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की असं काही नाही. कमिटीमध्ये स्वतः हा अजित दादा होते. सिल्व्हर ओकमध्ये दादा स्वतः हा आले होते आणि त्यांनी देखील साहेबांशी चर्चा केली. तिथं असं ठरलं होतं की ठराविक लोकच हे पत्रकार परिषदेला जातील. नाराज असल्याची जी चर्चा आहे ते योग्य नसल्याचं यावेळी रोहित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.