मुंबई, 3 मे : शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन मंगळवारी मुंबईत झाले. या पुस्तकामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंबद्दल देखील लिहीलं आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास शिवसेनेमध्ये वादळ येऊ शकतं याची मला कल्पना नव्हती असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच पक्ष नेत्वृत्व बंडखोरी रोखण्यास अपयशी ठरल्याचं देखील या पुस्तकात शरद पवार यांनी म्हटलं आहे.
या पुस्तकाबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते पुस्तक मी अजून वाचलं नाहीये. मात्र ते आत्मचरित्र आहे. त्यामुळे ती व्यक्तिगत भूमिका असेल. या लोकांच्या भूमिका नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या सर्व घडामोडींवर सामनातून उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध होईल आणि या संदर्भात सडेतोड उत्तर सामनातून मिळतील असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
New Ncp President : राष्ट्रवादीत घडणार मोठी घडामोड; पहिल्यांदाच होणार महत्त्वाचा निर्णय
तुमच्या शहरातून (मुंबई)
ते पुढे बोलताना म्हणाले की, ते अनेक वर्ष राजकीय प्रवास आणि संघर्ष केलेल्या राजकीय नेत्याचं आत्मचरित्र आहे. जर त्यात काही चुकीचं असेल तर त्याला संबंधित लोक उत्तर देतील प्रत्येकाला बाजू मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे यावर आता उद्धव ठाकरे सामनामधून आपली भूमिका मांडतील. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या मनातील अस्वस्थता मला जाणवत होती. शरद पवारांनी भाकरी फिरवली नाही तर पूर्ण तवाच फिरवल्याचंही यावेळी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.