मुंबई, 3 मे : मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शरद पवार यांच्या या निर्णयाचा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. शरद पवार याच्या या निर्णयानंतर कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, काल दिवसभर राजीनामा मागे घेण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांची आंदोलनं सुरू होती. आज देखील दिवसभर आंदोलनाची शक्यता आहे.
सिल्वर ओकवर सुरक्षा वाढवली
आज दिवसभर होणाऱ्या आंदोलनाची शक्यता लक्षात घेता, शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांच्या बैठका होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
शरद पवारांच्या निवृत्तीचा धक्का; …तर अन्नत्याग आंदोलन करणार, कार्यकर्त्यांचा इशारा
नेमकं काय म्हटलं होतं पवारांनी?
मंगळवारी मुंबईत शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्ककाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. माझ्या खासदारकीचे तीन वर्ष राहिली आहेत, आता आणखी नवी जबाबदारी नको म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.