पुणे, 18 मे : भाजप कार्यकारिणीच्या पुण्याच्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या राजीनाम्यावरून टोलेबाजी केली आहे. ‘टीआरपी कसा घ्यायचा, त्याचंही आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो, मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझाच पक्ष ठराव करेल, मग मीच माझा राजीनामा परत घेईन आणि मग मीच माझ्या जागी परत येईन. त्यांनी उद्धवजींना सांगितलं, राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे,’ असा निशाणा फडणवीसांनी साधला.
‘नवीनच चालू झालं आहे, कुणी म्हणतं भाकरी फिरवतो. कुणी म्हणतो भाकरी करपणार, काय महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. एक पक्ष भाकरी फिरवणारा, एक पक्ष भाकरीचे तुकडे तोडणारा आणि तिसरा पक्ष पूर्णपणे भाकरीच हिसकावून घेणारा. आपला एकमेव पक्ष आहे, जो गरिबांच्या भाकरीची चिंता करत आहे,’ असं फडणवीस म्हणाले.
हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर, समोर सुरक्षारक्षक, पुढे काय घडलं? Video
तुमच्या शहरातून (पुणे)
राष्ट्रवादीचा पलटवार
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या टीकेवर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शरद पवारांचं भाषण कळलं तर त्यांनी भूमिका मांडली होती. देशातल्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं की तुमची फार गरज आहे. पवार साहेबांनी आमच्याखातर राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला. आता पवार साहेबांनी राजीनामा मागे घेतला, तर त्याचा त्रास कुणाला होतोय, म्हणून हे कुणी बोलत असावं. पवार साहेब आता पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत, त्यामुळे काहींची खरच अडचण झाली आहे,’ असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांच्याभोवती महाराष्ट्राचं राजकारण गेली 60 वर्ष फिरत आहे, त्यांना कुठलाही ड्रामा करण्याची गरज नाही. शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय लोकांचा घास गिळला जात नाही, त्याबरोबरच पुढच्या दोन महिन्यातील नोकऱ्यांबाबत बोलूया. जीडीपी पाहता, किती लोकांच्या नोकऱ्या जातात, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.