मुंबई, 02 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशी घोषणा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली. अशीच घोषणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा केली होती. त्यावेळी लाखो शिवसैनिकांनी मातोश्रीकडे धाव घेतली होती. त्यानंतर बाळासाहेबांनी सर्वांच्या भावनांचा आदर करत निर्णय मागे घेतला होता. आता हात प्रसंग शरद पवार यांच्या बाबतीत घडला आहे. दिवसभर राष्ट्रवादीच्याा कार्यकर्त्यांनी सिल्व्हर ओक बाहेर ठिय्या मांडला होता.
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षांचे जरी असले तरी राजकीय विषय आला तर एकमेकांवर टीका करणार आणि जर मैत्रीचा विषय आला तर एकत्र जेवणार. अशी ही शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री होती. त्यामुळे पवारांनी कित्येक सभा आणि कार्यक्रमामध्ये बाळासाहेबांसारखा दोस्त नाही, असं बोलून दाखवलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
(राष्ट्रवादीचा किंगमेकर कोण? जाता जाता पवारांकडून समिती स्थापन, या नेत्यांचा समावेश)
पण आज कालचक्र जरा उलट फिरलं. आधीच बाळासाहेबांची शिवसेना फुटली आणि त्यानंतर पवारांची राष्ट्रवादीही त्याच उंबरठ्यावर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली. अखेरीस आज पवारांनी आपल्याच मित्राच राजीनामास्त्र उपसलं.
आज ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी अचानकपणे राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. कार्यकर्ते यांना अक्षरश: रडू कोसळलं. जे नेते मोठ्या उमेदीने भाषणाला आले होते, तेही ढसाढसा रडायला लागले. त्यानंतर सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची सर्वच नेत्यांनी समजूत काढली.
आता असंच राजीनामास्त्र बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा उगारलं होतं. 1978 मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा दारूण पराभव झाला. एकूण 35 जागा लढवूनही भोपळाही फोडता आला नाही. मुंबईतील सगळ्या 345 जागा याा जनता पक्षाने जिंकल्या होत्या. त्यामुळे बाळासाहेबांनी मुंबई पालिकेवर भगवा फडकवणारच अशी शपथ घेतली आणि जर नाही जिंकलो तर शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा देईल, अशी घोषणा केली.
(दादा-ताईंनी समजावल्यानंतरही कार्यकर्ते ऐकेना, अखेर पवारांचा फोन आला अन्…Video)
1978 च्या मुंबई महापालिकेत शिवसेनेनं पूर्ण ताकदीने 117 उमेदवार मैदानात उतरवले पण या निवडणुकीत फक्त 21 उमेदवारच निवडून आले होते. या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे बाळासाहेब चांगलेच संतापले होते. त्यांनी शिवाजी पार्कवर मेळावा बोलावला आणि राजीनामा देत असल्याची घोषणाच करून टाकली. बाळासाहेबांनी अचानक घोषणा केल्यामुळे शिवसैनिक पुरते हादरले. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली. रडारड आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. अखेरीस बाळासाहेबांनी आपला निर्णय मागे घेतला.
त्यानंतर बाळासाहेबांसमोर पुन्हा एकदा असाच पेच प्रसंग निर्माण झाला. बाळासाहेबांवरच घराणेशाहीचा आरोप झाला. तो काळ होता 1992 चा. त्यावेळी माधव देशपांडे या शिवसैनिकाने बाळासाहेब ठाकरे हे मुलांनाच मोठं करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे शिवसेनाप्रमुख व्यथित झाले आणि त्यांनी सामना दैनिकात शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचा कुटुंबासह अखेरचा जय महाराष्ट्र असं निवेदनच देऊन टाकलं. मग काय शिवसैनिकांनी मातोश्रीकडे धाव घेतली. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. भर पावसामध्ये शिवसैनिक मातोश्रीबाहेर उभे होते. शिवसैनिकांचं हे प्रेम पाहून बाळासाहेबांनी राजीनामास्त्र तलवार म्यान केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.