मुंबई, 14 मे : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलावली आहे. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीपूर्वीच काँग्रेसनं आपली स्वतंत्र बैठक बोलावल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. टिळक भवनमध्ये काँग्रेसच्य बैठकीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघडीच्या बैठकी आधीच काँग्रेस पक्षाची रणनिती ठरवली जाणार आहे. या बैठकीला नाना पटोले, अशोक चव्हाण, नसीम खान यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.
नाना पटोलेंची प्रतिक्रिया
दरम्यान नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की, आगामी काळात जिल्हा, ब्लॉक आणि तहसील स्तरावर बदल करायचे आहेत. बदलाबाबत राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. जूनपर्यंत बदल अपेक्षित आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत आम्हाला फोन आले आहेत. आमचे किती नेते मुंबईत आहेत यांची माहिती मी घेतं आहे. चर्चा करून मवीआच्या बैठकीबाबत निर्णय घेऊ.
तुमच्या शहरातून (मुंबई)
कर्नाटक निकालानंतर सिल्वर ओकवर घडामोडींना वेग; शरद पवारांनी बोलावली मविआची बैठक
शरद पवारांनी का बोलावली बैठक?
आज होणाऱ्या बैठकीमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही बैठक बोलावली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या या विजयानं विरोधकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. पुढील वर्षी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका एकत्र लढण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडीचा विचार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजची बैठक बोलावण्यात आल्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.