मुंबई, 2 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे आज प्रकाश होणार आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. या पुस्तकामुळे पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत नव्हते. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया
या शपथविधीमागे शरद पवारांचाच हात आहे, अशी चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील अप्रत्यक्षरित्या पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांचा हात असल्याचं वक्तव्य केलं होतं. यामुळे चर्चेला उधाण आलं. शरद पवार यांनी मात्र याबाबत कधीच कोणती प्रतिक्रिया दिली नाही. परंतु आता त्यांनी आपल्या पुस्तकात याबाबत खुलासा केला आहे. अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी समजल्यावर धक्का बसल्याची कबुली शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगती पुस्तकाच्या दुसऱ्या भागात दिली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
उद्धव ठाकरेंवर प्रतिक्रिया
दरम्यान शरद पवार यांनी आपल्या या पुस्तकात उद्धव ठाकरेंबद्दल देखील अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात पहिल्या टप्प्यात उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यास शिवसेनेमध्ये वादळ माजेल याचा अंदाज आपल्याला नव्हता. हा उद्रक शमावयला शिवसेना नेतृत्व कमी पडले. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलताना असलेली सहजता उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधताना कधी जाणवली नाही. उद्धव ठाकरे यांची प्रकृती, त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा यामुळे त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागत होती असा खळबळजनक दावा शरद पवार यांनी आपल्या या पुस्तकात केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.