मुंबई, 2 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात सुरु आहे. या हायव्होल्टेज सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतक झळकावल आहे. आरसीबीच्या पहिल्याच सामन्यात विराटने ही दमदार खेळी केली असून यामुळे त्याचे फॅन्स उत्साहित झाले आहेत.
बंगळुरुच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर मुंबई विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीकरून मुंबईने आरसीबीला विजयासाठी 172 धावांच आव्हान दिल. विजयाचं आव्हान पूर्ण करण्यासाठी आरसीबीकडून कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली मैदानात उतरला. सुरुवातीपासूनच विराट आणि प्लेसिसने चौकार षटकारांची आतिषबाजी करत धमाकेदार खेळीला सुरुवात केली. फलंदाजी करताना विराट प्लेसिसच्या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांना अक्षरशः लोळवळ.
सुरुवातीला 10 व्या ओव्हरमध्ये 31 चेंडूत 57 धावा करून कर्णधार फाफ डु प्लेसिसने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर 12 व्या ओव्हरमध्ये विराट कोहलीने 38 चेंडूत 50 धावा करत आयपीएल 2023 च्या आरसीबीच्या पहिल्याच सामन्यात विराटने दमदार अर्धशतक ठोकल. हे अर्धशतक विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीतील 45 व अर्धशतक ठरलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.