मुंबई, 2 एप्रिल : जगभरातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. आज आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. पहिल्याच सामन्यात आरसीबीला मोठा धक्का बसला असून त्यांचा महत्वाचा गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे.
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामन्याला सुरुवात झाली आहे. यापूर्वी दोन संघांमध्ये टॉस झाला असून हा टॉस आरसीबीच्या कर्णधाराने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा मुंबई इंडियन्सकडून सलामी फलंदाज म्हणून ईशान किशन आणि रोहित शर्माची जोडी मैदानात उतरली. परंतु मैदानात उतरताच आरसीबी संघाने सुरुवातीच्या सहा ओव्हरमध्ये ईशान किशन, कॅमेरून ग्रीन आणि रोहित शर्माची विकेट घेतली. परंतु मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची विकेट घेताना आरसीबीला धक्का बसला.
Hope Topley is fine 😞
Come back stronger #RCBvMI pic.twitter.com/wrpqM10K3j
— V I P E R™ (@VIPERoffl) April 2, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.