मुंबई, 11 मे : जिओसिनेमा (JioCinema) हा टाटा आयपीएल 2023 (TATA IPL 2023) स्पर्धेचा अधिकृत डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर असून, डिजिटल प्लॅटफॉर्मवर खेळाच्या व्ह्यूअरशिपच्या बाबतीत त्याने विक्रम केला आहे. पहिल्या पाच आठवड्यांत जिओ सिनेमावर टाटा आयपीएलला 1300 कोटींहून अधिक व्हिडिओ व्ह्यूज मिळाले आहेत. जिओ सिनेमाच्या फॅन-सेंट्रिक सादरीकरणाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. जिओसिनेमावर प्रत्येक मॅच प्रत्येक व्ह्यूअरने सरासरी 60 मिनिटं पाहिली. HD TVवरच्या प्रेक्षकांच्या तुलनेत कनेक्टेड टीव्हीवरच्या व्ह्यूजची संख्या दुप्पट होती.
‘व्हायाकॉम18 स्पोर्ट्स’चे सीईओ अनिल जयराज यांनी सांगितलं, ‘दर आठवड्याला जिओसिनेमाची ताकद वाढतच जाते आहे. TATA IPL डिजिटल माध्यमात पाहायला प्रेक्षकांचं प्राधान्य आहे, याचा हा सबळ पुरावा आहे. क्रिकेटचा सर्वोत्तम थरार आणि आमचा उत्तम प्लॅटफॉर्म यांमुळे वीकेंडला उत्तम कामगिरी झाली आहे. भविष्यातल्या एका मोठ्या कामगिरीची ही फक्त सुरुवात आहे. आमच्या प्रवासावर विश्वास दाखवल्याबद्दल आमचे सर्व प्रायोजक, जाहिरातदार आणि भागीदार यांचे मी आभार मानू इच्छितो. TATA IPL पाहण्याचा प्रत्येक चाहत्याचा अनुभव अधिकाधिक चांगला करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.’
12 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स या मॅचच्या प्रेक्षकसंख्येने 2.23 कोटींचा सर्वोच्च टप्पा गाठला. त्यानंतर पाच दिवसांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या मॅचमध्ये जिओसिनेमावर प्रेक्षकसंख्येने आधीचा विक्रम मोडून 2.4 कोटींचा सर्वोच्च टप्पा गाठला.
आतापर्यंत जिओसिनेमाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. फॅन्सना मॅचचा उत्तम अनुभव घेता यावा यासाठी 360 डिग्री व्ह्यूइंग फीचर देण्यात आलं आहे. डिजिटल माध्यमात इमर्सिव्ह फॅन एंगेजमेंटची क्षमता काय असू शकते, हे या निमित्ताने सिद्ध झालं आहे. भोजपुरी, पंजाबी, मराठी, गुजराती आदी भाषांमधली फीड्स, तसंच मल्टि-कॅम, 4K, हाइप मोड यांसारख्या फक्त डिजिटल माध्यमातल्या फीचर्सचा प्रेक्षकांनी आनंद घेतला आहे. आयपीएलच्या टॉप टीम्सबरोबर असलेल्या पार्टनरशिपमुळे विराट कोहली, हार्दिक पंड्या, फाफ डू प्लेसिस, राशीद खान, डेव्हिड मिलर आदी आघाडीच्या खेळाडूंच्या मुलाखती, तसंच हायलाइट्स यांसह अत्यंत एक्सायटिंग, थरारक, रोमांचक, अॅक्शन-पॅक्ड एक्स्क्लुझिव्ह कंटेंटचा प्रेक्षकांनी आनंद लुटला आहे.
हेही वाचा – IPL 2023 : 20 कोटी तयार ठेवा! पियुष चावला मुंबईसाठी तयार करतोय धमाकेदार बॅट्समन
जिओसिनेमावरच्या जाहिरातदारांची संख्या आणि त्यातून मिळालेलं उत्पन्न या दोन्हींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. डिजिटल माध्यमावर सहभागी होणाऱ्या ब्रँड्सची संख्या आणखीही वाढण्याची शक्यता आहे.
TATA IPL 2023च्या डिजिटल स्ट्रीमिंगसाठी जिओसिनेमाने 26 टॉप ब्रँड्सशी भागीदारी केली आहे. त्यामध्ये (को-प्रेझेंटिंग पार्टनर) ड्रीम 11, (को-पॉवर्ड) जिओमार्ट, फोनपे, टियागो ईव्ही, जिओ (असोसिएट स्पॉन्सर) अॅप्पी फिझ, ईटी मनी, कॅस्ट्रॉल, टीव्हीएस, ओरिओ, बिंगो, स्टिंग, एजिओ, हेअर, रूपे, लुईस फिलिप जीन्स, अॅमेझॉन, रॅपिडो, अल्ट्रा टेक सिमेंट, प्युमा, कमला पसंद, किंगफिशर पॉवर सोडा, जिंदाल पँथर टीएमटी रेबर, सौदी टुरिझम, स्पॉटिफाय, एएमएफआय यांचा समावेश आहे.
डिफेंडिंग चॅम्पियन्स गुजरात टायटन्स, पाच वेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स या टीम्सनी जिओसिनेमाशी एक्स्क्लुझिव्ह पार्टनरशिप जाहीर केली आहे. ग्लोबल क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकर, भारताचा मोस्ट सेलिब्रेटेड क्रिकेट कॅप्टन आणि चार वेळचा आयपीएल विजेता एम. एस. धोनी, वर्ल्ड नंबर वन टी-20 बॅट्समन सूर्यकुमार यादव, भारताच्या महिला टीमची व्हाइस कॅप्टन स्मृती मानधना यांनी जिओसिनेमाशी हातमिळवणी केली असून, वर्ल्ड क्लास डिजिटल फर्स्ट TATA IPL प्रेझेंटेशनमध्ये त्यांचाही सहभाग असेल.
प्रेक्षक iOS आणि अँड्रॉइडवर जिओसिनेमा अॅप डाउनलोड करून याचा आनंद घेऊ शकतात. लेटेस्ट अपडेट्स, बातम्या, स्कोअर्स, व्हिडिओज यांसाठी फॅन्स Sportsला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यू-ट्यूबवर आणि JioCinema ला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि यू-ट्यूबवर फॉलो करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.