नवी दिल्ली, 24 एप्रिल : पाकिस्तानी वंशाचे ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार तारिक फतेह यांचं निधन झालं आहे. ते 73 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कँन्सरशी लढा देत होते. कनाडामध्ये राहणारे तारिक फतेह हे दशहतवाद आणि इस्लामाबद्दल परखड मत व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक वेळा पाकिस्तानाला खडेबोल सुनावले होते आणि भारतातील एनडीए सरकारचं समर्थन सुद्धा केलं होतं.
ज्येष्ठ लेखक तारिक फतेह हे गेल्या काही दिवसांपासून कँन्सरशी लढा देत होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची मुलगी नताशा फतेह यांनी “पंजाबचा वाघ, हिंदुस्तानचा मुलगा, कॅनाडा प्रेमी, सत्य वक्ता, न्यायासाठी लढणारा, दलित आणि शोषितांचा आवाज तारिक फतेह आपल्याला सोडून गेले. त्यांनी केलेली क्रांतीही कायम राहणार आहे’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
(पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ने केली कमाल; 100 कोटी नागरिकांनी…)
विशेष म्हणजे, तारिक फतेह हे पाकिस्तानी वंशाचे जरी असले तरी ते स्वत: ला भारतीय समजत होते. ते नेहमी आपल्या भाषणातून मी भारत मातेचा पूत्र आहे, असं सांगायचे. तारिक फतेह यांचा कुटुंब हे मुंबईत राहणारे होते. 1947 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. तेव्हा त्यांचे कुटुंबीय हे कराची इथं गेलं होतं. तिथे 20 नोव्हेंबर 1949 ला कराचीमध्ये तारिक फतेह यांचा जन्म झाला.
लेखक तारिक फतेह यांनी कराची विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारितेत आपलं नशीब आजमावून पाहिलं. ते एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीमध्ये ते काम सुद्धा करत होते.
अनेक वेळा गेले जेलमध्ये
तारिक फतेह यांनी शोध पत्रकारितेमध्ये चांगलं काम केलं. त्यामुळे त्यांना अनेक वेळा जेलमध्येही जावं लागलं होतं. पाकिस्तानमध्ये त्यांच्याविरोधात कारवाया होत होत्या. त्यामुळे 1987 मध्ये तारिक अहमद हे कॅनाडा राहण्यास गेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.