मुंबई, 27 एप्रिल : खराब जीवनशैलीमुळे पाठदुखीची ही एक सामान्य समस्या बनली आहे. आज स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण या समस्येशी झुंजत आहे. ही समस्या तरुणांनाही जाणवत आहे. पाठदुखीची अनेक कारणे असू शकतात जसे की तासनतास एकाच स्थितीत बसणे, जड वस्तू अचानक उचलणे, दुखापत झाल्यामुळे किंवा शरीरात कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे नसणे. तसेच महिलांमध्ये ही समस्या गर्भाशयात सूज आणि मासिक पाळीमुळे देखील असू शकते.
या दुखण्यावर मात करण्यासाठी बाजारात अनेक औषधी उपलब्ध आहेत. परंतु तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या 5 गोष्टींचा वापर करून या दुखण्यापासून आराम मिळवू शकतात. लखनऊचे आयुर्वेदाचार्य डॉ जितेंद्र शर्मा यांच्याकडून या नैसर्गिक वेदनाशामकांबद्दल जाणून घेऊया.
उपवास केल्याने सुधारते मानसिक आणि शारीरिक आरोग्य, पाहा कसा होतो फायदा
हे आहेत 5 नैसर्गिक वेदनाशामक
आले : आले हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असते त्यामुळ ते अनेक प्रकारच्या समस्यांवर गुणकारी आहे. सर्दी-खोकला, पचन यांसारख्या समस्या दूर करण्यासोबतच पाठदुखीसाठीही आले खूप फायदेशीर ठरते. पाठदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही आल्याचा एक डिकोक्शन बनवून ते पिऊ शकता. यासाठी एक कप पाण्यात थोडे आले टाकून मंद आचेवर 10-15 मिनिटे शिजवा. यानंतर ते गाळून घ्या आणि एक चमचा मध घालून प्या. तुम्ही दिवसातून दोनदा नियमितपणे हे पेय पिऊ शकता. असे केल्याने पाठदुखीच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळेल. तुम्हाला हवे असल्यास आल्याच्या तेलाने पाठीला मसाजही करू शकता.
सैंधव मीठ/ सेंधा मीठ : सैंधव मीठ हे अनेक प्रकारच्या वेदनांसाठी नैसर्गिक वेदनाशामक आहे. पाठदुखीवर हे रामबाण औषधासारखे काम करते. साधारणपणे ते आयोडीनयुक्त मीठाप्रमाणे स्वयंपाकासाठी देखील वापरले जाऊ शकते. यासाठी पाण्यात सेंधा मीठ टाकून घट्ट पेस्ट बनवा. यानंतर कंबरे, पाठीला लावा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
हळद : हळद हे अंतर्गत जखमा आणि वेदनांवर एक महत्त्वाचे औषध मानले जाते. शरीरात वेदना होत असतील तर तुम्ही गरम दुधात हळद घालून पिऊ शकता किंवा तेलासोबत गरम करून तो लेप लावू शकता. दुधासोबत हळदीचे घेतल्याने पाठदुखी तसेच शारीरिक वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते.
लसूण : लसूण हे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटकांनी समृद्ध औषध आहे. लसणाचा उपयोग फक्त जेवणातच नाही तर शारीरिक वेदनांवरही होतो. पाठदुखीचा त्रास होत असेल तर तेलात उकळून मसाज करू शकता. यासाठी मोहरीच्या तेलात लसणाच्या ४-५ कळ्या टाकून उकळा. नंतर ते गाळून थंड झाल्यावर मसाज करा. या तेलाने नियमित मसाज केल्याने पाठदुखीपासून आराम मिळेल.
सॅलडमध्ये काकडी-टोमॅटो एकत्र खाणं सुरक्षित असतं का? शरीरावर असा होतो परिणाम
दालचिनी : दालचीनीमुळे विशेषतः स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते. याशिवाय जास्त रक्तस्त्राव होत असला तरीही ती तुम्हाला मदत करेल. यासाठी दालचिनीचा चहा बनवून प्या किंवा गरम पाण्यात दालचिनी पावडर टाकून प्या. असे केल्याने शारीरिक वेदना आणि पाठदुखीपासून आराम मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.