मुंबई, 24 एप्रिल : बदलत्या काळानुसार बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्करोगाचं वेळीच निदान झाल्यास तो टाळण्याची सर्व शक्यता असते. परंतु अनेक जणांना हा आजार ओळखण्यास उशीर होतो. त्यामुळेच कर्करोगाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. WHO च्या मते, कर्करोगामुळे दरवर्षी एक कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यापैकी किडनीच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही कमी नाही. मूत्रपिंडाच्या पेशींमध्ये डीएनए बदलण्यापासून मूत्रपिंडाचा कर्करोग सुरू होतो.
मायो क्लिनिकनुसार, रेनल सेल कार्सिनोमा हा मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. काही मुलांमध्येही किडनीच्या कर्करोगाची प्रकरणे झपाट्याने वाढू लागली आहेत. किडनीचा कॅन्सर सुरुवातीला ओळखणे खूप अवघड असते. अनेकवेळा लोक इतर काही कारणास्तव सीटी स्कॅनसाठी जातात तेव्हा अचानक किडनीचा कर्करोग आढळतो. परंतु कोणतीही लक्षणे न दिसता मूत्रपिंडाचा कर्करोग आढळून आला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.
उन्हाळ्यात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना जास्त गरम का होते? तज्ज्ञांनी सांगितले याचे कारण
मूत्रपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे
लघवीत गुलाबी रंगाचे रक्त : किडनीचा कॅन्सर सुरुवातीला ओळखणे कठीण असले तरी जेव्हा हा आजार गंभीर होतो तेव्हा लघवीतून रक्त येऊ लागते. हे रक्त गुलाबी किंवा लाल रंगाचे असू शकते. ही धोकादायक चिन्हे आहेत. त्यामुळे लघवीतून येणाऱ्या रक्ताकडे कधीही दुर्लक्ष करू नका.
पाठदुखी : काही लोकांना वारंवार पाठदुखीचा त्रास होतो. जर पाठदुखी आणि साइड पेन सतत होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण ते मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे लक्षण देखील असू शकते.
भूक न लागणे : किडनीच्या कर्करोगात ट्यूमर झाल्यानंतर रुग्णाला भूक लागत नाही. मात्र, इतर काही आजारांमध्येही भूक लागत नाही. पण कोणत्याही कारणाने भूक लागत नसेल तर त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
अचानक वजन कमी होणे : कर्करोगाच्या बहुतेक केसेसमध्ये अचानक वजन कमी होते. कसलेही प्रयत्न न करता अचानक वजन कमी झाल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
थकवा : थकवा हे देखील अनेक प्रकारच्या कर्करोगाचे लक्षण आहे. कोणत्याही कारणाशिवाय सतत थकवा जाणवत असेल तर ते मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
या लोकांना जास्त असतो किडनी कॅन्सरचा धोका
धूम्रपान : धूम्रपान न करणाऱ्या लोकांपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांना किडनीच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो.
लठ्ठपणा : वजन जास्त असलेल्या लोकांमध्ये सर्व प्रकारच्या आजारांचा धोका जास्त असतो, परंतु किडनीच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतो.
उच्च रक्तदाब : उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो. म्हणूनच उच्च रक्तदाब नियंत्रित करणे आवश्यक आहे.
Diabetes Tips : डायबिटीजच्या लोकांनी उन्हाळ्यात नारळ पाणी प्यावं का, काय होतात परिणाम?
जास्त वय : वृद्ध व्यक्तींमध्ये किडनीच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्हाला लघवीमध्ये काही त्रास जाणवतो तेव्हा तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.