ठाणे, 12 मे : ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर या महानगरपालिकांसह वागळे इस्टेट, नवी मुंबईतील टीटीसी औद्योगिक क्षेत्राला होणारा पाणी पुरवठा आज आणि उद्या बंद राहणार आहे. यामुळे या भागात नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून या भागात पाणीपुरवठा केला जातो.
बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यात पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. या धरणातल्या पाण्याचा पुरवठा एमआयडीसीकडून जिल्ह्यातल्या सर्व औद्योगिक क्षेत्रात केला जातो. जवळपास 585 दक्षलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा दरदिवशी करण्यात येतो. त्यापैकी एमआयडीसीकडून 135 दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होतो. ठाण्याशिवाय कल्याण डोंबिवली, डोंबिवली एमआयडीसी, अंबरनाथ टीटीसी, ठाणे, बदलापूर औद्योगिक क्षेत्र, उल्हासनगर, नवी मुंबई, मिरा भाईंदर या शहरांमध्येही एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो.
Weather Update : काळजी घ्या! उन्हाच्या झळा वाढणार, राज्यात आज ‘या’ ठिकाणी उष्णतेची लाट
तुमच्या शहरातून (मुंबई)
अनेक जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्या फुटण्याच्या घटना सतत घडत आहेत. पाईपलाईन फुटल्याच्या घटनांमुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. असे प्रकार टाळण्यासाठी एमआयडीसीने नव्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. टप्प्या टप्प्याने हे काम सुरू करण्यात आलंय. एमआयडीसी आज हे काम करणार असून यामुळे शुक्रवार 12 मे रोजी दुपारी 12 ते शनिवार 13 मे रोजी दुपारी 12 या वेळेत पाणी पुरवठा बंद असेल. याचा परिणाम ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर भागासह ठाण्यातल्या वागळे इस्टेट आणि नवी मुंबईतल्या टीटीसी औद्योगिक क्षेत्रात पाणी पुरवठा बंद राहील.
एमआयडीसीकडून कळवा, दिवा, मुंब्रा, वागळे इस्टेटमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर आणि कोलशेत खालचा गाव या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. या भागातला पाणीपुरवठा आज दुपारी 12 वाजल्यापासून पुढील 24 तास बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.