रायचंद शिंदे, पुणे, 04 एप्रिल : हिंगोलीचा पाण्यावर तरंगणारा बाबा अनेकांनी पहिला आणि त्यानी केलेला दावाही. मात्र यात काही रॉकेट सायन्स नाही तर हे योगामुळे साध्य होत असून अनेकांनी हे स्किल साध्य केले आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण येथील योग शिक्षक बापूसाहेब सोनवणे याबाबत अनेक दिवसांपासून काम करत आहेत.अनेकांना पाण्यापासून जीवाला भीती वाटत असते यातून अपघात होतात मात्र या अवलियाने या भीतीवरच विजय मिळवलाय.
पाणी हा पंच महाभूतांमधील महत्वाचा घटक. याच पाण्याला आपण जीवन असंही म्हणतो. पण जेव्हा एखाद्याला पोहता येत नाही तेव्हा मात्र वेळप्रसंगी त्याला मृत्यू चा सामना करावा लागतो. पाण्यात हातपाय हलवून पोहणारे अनेकजण आपण पाहतो पण हातपाय ना हलवता कितीही काळ पाण्यात राहणे मात्र अशक्यप्राय गोष्ट आहे .पण ही किमया चाकणच्या बापूसाहेब सोनवणे यांनी साध्य केलीय.
भल्यामोठ्या उंच झाडावर चढून महिला करत होती ‘हे’ काम, काही क्षणात Video व्हायरल
तुमच्या शहरातून (पुणे)
पद्मासन,शवासन,उत्कटासन, मत्स्यसन,उष्ट्रासन,धनुरासंन,अर्धाचक्रासंन, पाण्यात सरळ उभे राहणे,चालत जाणे ,राष्ट्रगीत म्हणने, असे प्रकार ते सहज करतात. त्यांचे शिष्य ही यात तरबेज होत आहेत. ते जमिनीवर योगासने करतात पण पाण्यातही उत्तम योगासने करतात. हातपाय न हलवता 4 तास सलग पाण्यात तरंगून राहत योगासने केल्यामुळे त्यांची OMG बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने दखल घेतलीय.
जलयोग आणि हवेतील योगाने संपूर्ण शरीराला ताण मिळत असल्याचे ते सांगतात. बापूसाहेब सोनवणे अनेक ठिकाणी मोफत योग शिबिरे आयोजित करत असतात. पोलीस अधिकारी आणि अमलदारांना ते मोफत योग शिकवतात. पाणी म्हणजे काय हे लोकांनी समजून घेतलं तर ज्या आजारांवर जमिनीवरच्या योगासनांनी फायदे होतात तेच पाण्यात केले तर अधिक फायदे होतील. तसेच दमछाक होऊन जे मृत्यू होतात ते कमी होतील याबाबत पाण्याविषयी लोकजागृती करून जास्तीत जास्त लोकांना वाचवणे आपला उददेश असल्याचे सोनवणे सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.