धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 1 मे : नोकरी नाही, काय करू? असं म्हणत परिस्थितीला दोष देणारे अनेक धडधाकट तरुण आपण पाहतो. आपलं अपयश लपवण्यासाठी वेगवेगळी कारणं शोधणारी मंडळीही आपल्या सभोवताली आहेत. त्याचबरोबर अगदी विपरित परिस्थितीमध्येही मार्ग काढण्यासाठी धडपडणारी मंडळीही आहेत. दोन्ही पायानं अपंगत्व, घरातील परिस्थितीही अगदी बेताची… त्यानंतरही खचून न जाता, कुणापुढे हात न पसरता मुंबईतील एक तरुण फुड डिलिव्हरीच्या क्षेत्रात काम करत आहे. त्याचा संघर्षमयी प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
काय आहे पार्श्वभूमी?
तुमच्या शहरातून (मुंबई)
प्रवीण शिंदे असं या जिद्दी तरुणाचं नाव आहे. ते मुंबईतील चांदिवलीमध्ये राहतात. त्यांच्या घरातील परिस्थिती बेताची आहे. त्यातच दीड वर्षाचे असतानाच त्यांना पोलिओ झाला. त्या परिस्थितीमध्येही त्यांनी एसवाय बीकॉमपर्यंतचं शिक्षण घेतलं. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना नोकरी करणं भाग होतं.
प्रवीण यांनी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले. खासगी कंपनींमध्येही मुलाखत दिली. पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. त्यावेळी एका एनजीओच्या मदतीनं त्यांच्या पंखांना बळ मिळालं. द्युत सायकलच्या माध्यमातून प्रविणने झोमॅटो फूड डिलिव्हरी ॲप मध्ये काम करण्यास सुरुवात केली. सध्या ते मुंबईतील पवई परीसरात फूड डिलिव्हरीचं काम करतात.
कशी मिळाली प्रेरणा?
आपला आजवरचा अनुभव सांगताना प्रवीण म्हणाले की, ‘लहानपणापासून अपंगत्व आल्यानं मी हाताश झालो होतो. मी एकटा असतो तर परिस्थिती वेगळी होती. माझ्यापाठी आई, पत्नी, मुलगा असं कुटुंब आहे. माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहेत. मी त्यांच्यासाठी काय करणार? असा विचार करत होतो, त्यावेळी ही संधी मिळाली. ‘
न बोलता मोठं काम करणारा मुंबईकर, सामान्यांमध्ये करतोय जागृती! Video
अनेक अडचणी पण…
प्रवीण यांना ही विद्युत सायकल मिळाली. मात्र रस्त्यावर चालवायची कशी ? जमेल का? फूड डिलिव्हरी कसं करणार ? असे एक ना अनेक प्रश्न त्यांना पडू लागले होते. मुंबईतील बहुतांश हॉटेल, रेस्टॉरंट हे पहिल्या मजल्यावर किंवा त्यांना पायऱ्या असतात. त्यामुळे ग्राहकांपर्यंत हे पार्सल कसं पोहचवायचं हा त्यांना प्रश्न होता.
‘या कामात माझे सहकारी तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंट कर्मचारी मदत करतात. त्याचबरोबर ग्राहकही खाली घेऊन स्वत: पार्सल घेतात आणि कौतुकाची थाप देतात,’ असं प्रवीणनं सांगितलं. आगामी काळात दिव्यांग व्यक्तींना या प्रकारचा रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रवीणनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.