गोविंद वाकडे, प्रतिनिधी
पुणे, 17 एप्रिल : पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील रावेर भागामध्ये मोठी घटना घडली आहे. पावसाच्या आडोशाला थांबलेल्या प्रवाशांवार होर्डिंग कोसळले आहे. या अपघातात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती.
तुमच्या शहरातून (पुणे)
वादळी पावसाने रावेत किवळे येथील कात्रज बायपास जवळच्या सर्व्हिस रोडवर एका पंक्चरच्या दुकानाजवळ येणारे जाणारे प्रवाशी थांबले होते. पण अचानक जाहिरातीचा फलक कोसळला यात सात ते आठ जण अडकले होते. तात्काळ देहूरोड पोलीस आणि रावेत पोलिसांच्या टीमने स्थानिक नागरिक आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या मदतीने या लोकांना बाहेर काढले.
होर्डिंग कोसळून ४ ते ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून यात ८ जण अडकले होते. पैकी ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती रावेत पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.