मुंबई, 9 मे : पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कशेडी घाटातील मुंबई गोवा हायवेवरील बोगद्यातून एकेरी वाहतूक येत्या पावसाळ्यापूर्वी सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. राज्यातील ग्रामीण रस्ते, राष्ट्रीय महामार्ग यांच्या कामांचा आढावा आज मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले रवींद्र चव्हाण?
महाराष्ट्रात विशेष करून 3 लाख किलो मीटर रस्ते, यात नॅशनल, राज्यस्तरीय व ग्रामीण रस्ते जलतगतीने होताना दिसत आहे. यात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. ज्या अडचणीत येत होत्या त्या संबधित अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आलं होतं. एकाच टेबलावर सर्व असल्याने अनेक निर्णय हे अडथळ्यामुळे म्हणजे वनविभाग, महसूल या संबधित येणाऱ्या अडथळ्यांवर आज चर्चा करून तोडगा काढण्यात आला. मुंबई गोवा हायवेमध्ये येणाऱ्या अडचणीचाही आढावा घेतला. या रस्त्याला दिरंगाई झाली हे रस्ते तीन टप्यात पूर्ण होणार आहेत. पावसाळ्यापूर्वी यातील अनेक रस्ते सिंगल लेन पूर्ण होतील. परशुराम घाटात माती कोसळल्यामुळे ती माती काढून तेही पूर्ण होईल. कोस्टल रोडचाही आढावा घेतला. नॅशनल हायवेसाठी एक मुख्य कार्यालयाला हवं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ते मान्य झालं होतं. मात्र, आता त्याची जागा बेलापूर येथे निश्चित झाली आहे. नागपूर गोवा त्यात बरोबर इतर राज्य व ग्रामीण रस्त्यांचाही आढावा घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परशुराम घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या चिरणी आंबडस मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मात्र, पोलिसांनी आता वाहतूक सुरळीत केली आहे. तर परशुराम घाटातील रस्त्यावर आलेल चिखल मिश्रित माती काढण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या या ठिकाणाहून एकेरी वाहतूक सुरु करण्यात यश आले आहे. मात्र, दरड खाली येण्याचा धोका आहे. त्यामुळे परशुराम घाटातून प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाचा – 1 हजार वर्षांपूर्वीची विष्णूमूर्ती नदीतून मिळाली PHOTOS पाहून व्हाल अचंबित
डोंगरची माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या चार तासाच्या प्रयत्नानंतर परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे. मात्र, रस्त्यावर आलेली माती बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले तरी अवकाळी पाऊस झाला तर पुन्हा माती खाली येण्याची शक्यता आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल परशुराम घाटातील रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद पडली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.