पिंपरी-चिंचवड, 22 मे : मागच्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या आणि विशेष करून पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. शहरामध्ये पुन्हा एकदा गोळ्या घालून एका 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. चिखली गावामध्ये टाळगाव चिखली कमानीजवळ कृष्णा उर्फ सोन्या तापकीर याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यामध्ये सोन्याचा जागीच मृत्यू झाला.
हल्ल्याच्या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, यानंतर सोन्या तापकीरला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सोन्यावर नेमका कुणी हल्ला केला याचा तपास पोलीस घेत आहेत.
याच महिन्यामध्ये तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या परिसरात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली होती. वडिलांचा अपमान केल्याच्या रागातून माजी नगरसेवकाच्या मुलानेच ही हत्या घडवून आणल्याचं पोलिसांनी सांगितलं. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदेने मित्रांच्या मदतीने हा खून केला, असा दावा पोलिसांनी केला.
तुमच्या शहरातून (पुणे)
किशोर आवारे यांची दुपारी दोन वाजता तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या परिसरात हत्या झाली. यावेळी हल्लेखोरांनी आधी गोळी झाडल्या. या गोळीबारात किशोर आवारे जागीच कोसळले. हल्लेखोर तेवढ्यावर न थांबता आवारे यांच्या डोक्यात कोयत्यानेही वार केले. यामुळे किशोर आवारे यांच्या चेहरा छिन्नविछिन्न झाला होता.
1 एप्रिलला मावळमध्येही शिरगावच्या सरपंचांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सरपंच प्रविण गोपाळे यांचा मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.