नीलम कराळे, प्रतिनिधी
पुणे, 11 एप्रिल : पुण्यामध्ये प्रवास करत असताना अनेक वेळा ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. यामुळे प्रवास करताना बराच वेळ जातो. प्रवास करताना कंटाळा येतो. हाच कंटाळा दूर करण्यासाठी पुण्यातील एका रिक्षाचालकांने एक स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. रिक्षातील प्रवाशांना प्रवास करताना कंटाळा येऊ नये म्हणून रिक्षामध्येच पुस्तके उपलब्ध करून दिले आहेत. रिक्षामध्ये त्याने एक छोटेसे वाचनालय सुरू केले आहे. यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.
कशी झाली सुरुवात?
तुमच्या शहरातून (पुणे)
पुण्यातील रिक्षा चालक प्रशांत कांबळे यांनी आपल्या रिक्षामध्ये वाचनालय सुरू केले आहे. प्रशांत यांना वाचण्याची आवड आहे. त्यामुळे ते रिक्षा चालवत असताना आपल्या रिक्षामध्ये स्वतःसाठी देखील पुस्तक ठेवत आणि यातूनच त्यांना असे वाटले की आपण आपल्या ग्राहकांसाठी देखील रिक्षामध्ये पुस्तके ठेवणे गरजेचे आहे. यावेळी त्यांची भेट प्रियंका चौधरी याच्यासोबत झाली. प्रियंका ओपन बुक लायब्ररी चळवळीमार्फत अनेक ठिकाणी विविध प्रकारची वाचनालय सुरू ठेवत आहे. तिने प्रशांत यांच्याशी बोलून त्यांना त्यांच्या रिक्षामधील फिरते वाचनालय सुरू करून दिले आणि या वाचनालयासाठी पुस्तके देखील तिने उपलब्ध करून दिली.
पुस्तके फ्री मध्ये वाचायला देतो
‘गेल्या तीन वर्षांमध्ये आतापर्यंत हजारो लोकांनी माझ्या रिक्षांमधून पुस्तके हाताळली असून हे सर्व पुस्तके आम्ही लोकांना फ्री मध्ये वाचायला देतो. तसेच त्यांच्या सोबतही पुस्तके ते फ्रीमध्ये घेऊन जातात. तसेच ज्या ग्राहकांना असे वाटते की त्यांच्याकडचे पुस्तके आम्हाला द्यावी ते देखील आम्हाला ही त्यांच्याकडचे काही चांगली पुस्तक देतात आणि हे पुस्तक हे अशा प्रकारे एकमेकांकडे माझ्या ओपन बुक लायब्ररी मधून माझ्या फिरत्या वाचनालयाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचतात.
यासाठी लोकांचा प्रतिसाद देखील खूप चांगला आहे. अनेक ग्राहकांना माझ्या रिक्षा मधील पुस्तके आवडतात. अशामुळे माझं असंख्य ग्राहक जोडले गेले आहेत जे रिक्षा करण्यासाठी मला फोन स्पेशल करता कारण की त्यांना माहीत असतं की माझ्या रिक्षामध्ये पुस्तके असतात. आणि त्या वेळामध्ये त्यांचा प्रवासी होतं आणि पुस्तक देखील वाचून होतात’,असं रिक्षा चालक प्रशांत कांबळे यांनी सांगितले.
Mumbai : बुद्धीच्या मशागतीसाठी सलूनमध्ये सुरु केलं ग्रंथालय, पाहा Video
मराठी भाषा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी
‘मराठी भाषा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी. लोकांनी मराठी मधली पुस्तके वाचावी यासाठी आमच्या ओपन बुक लायब्ररी तर्फे मराठी पुस्तके आम्ही विविध वाचणाऱ्यांना देत असतो. तसेच याच उपक्रमांतर्गत आम्ही पहिली फिरते वाचनालय सुरू केले आणि यामध्ये आम्हाला प्रशांत कांबळे यांची मोलाचे साथ मिळाली. त्यांनी त्यांच्या रिक्षामध्ये आतापर्यंत विविध पुस्तके आमच्या मार्फत ठेवले असून इतरही वाचक त्यांच्यापर्यंत पुस्तके पोहोचत असतात’असं प्रियंका चौधरी यांनी सांगितले.
पुस्तक वाचण्यासाठी संपर्क
प्रशांत कांबळे (९६२३१३९१९४)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.