पुणे, 27 मार्च : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी असून पुणेकरांची मेट्रो रेल्वेनं आता रुबी हॉलपर्यंत यशस्वी धाव घेतली आहे. मुठा नदी पार करत ही मेट्रो आज रुबी हॉल स्थानकापर्यंत धावली. मेट्रोची ही चाचणी यशस्वी ठरल्यानं सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. या परिसरातील नागरिकांनाही मेट्रोचा लाभ घेता येणार आहे.
पुणे शहरात मेट्रोची काम प्रगतीपथावर असून टप्प्याटप्प्यानं मेट्रो रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. शहरातील पहिला मेट्रो मार्ग वनाज ते रामवाडी या मार्गावर सध्या पहिल्या टप्प्यातील वनाज ते गरवारे कॉलेज मार्गावर मेट्रो सुरु आहे. त्यानंतर आजची चाचणी यशस्वी झाल्यानं लवकरच ही मेट्रो दुसऱ्या टप्प्यात लवकरच आणखी पुढच्या स्थानकांपर्यंत सुरु होण्याची आशा आहे.
वाचा – न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; पुण्यातील आरोपीला सुनावली तब्बल 250 वर्षांची शिक्षा
तुमच्या शहरातून (पुणे)
आता मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक ही ठिकाणे लवकरच मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत. आज पुणे मेट्रोची सिव्हिल कोर्ट स्थानक ते रुबी हॉल स्थानक ही चाचणी घेण्यात आली. ठीक 3.50 मिनिटांनी सिव्हिल कोर्ट स्थानक येथून मेट्रो ट्रेन निघाली. 4.07 मिनिटांनी रुबी हॉल स्थानक येथे ट्रेन पोहोचली. ट्रेनचा वेग 10 किमी प्रति तास असा होता.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही 12 किमीची मार्गिका 2022 मध्ये प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक- सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक – सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक – रुबी हॉल स्थानक या एकूण 12 किमीची मार्गिका लवकरच प्रवाश्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. उर्वरित कामे येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण झाल्यावर या मार्गीकांचे सीएमआरएस निरीक्षण करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त यांना बोलावण्यात येणार आहे. सीएमआरएस यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रवासी सेवा या मार्गावर सुरू प्रवास करता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.