पुणे, 10 जानेवारी : आजपर्यंत आपण सामान्यपणे काळ्या रंगाचेच कावळे पहात आलो आहोत. पण पुण्यात आज चक्क पांढऱ्या रंगाचा कावळा आढळून आला आहे. पुण्यातील लुल्ला नगर परिसरामध्ये हा पांढरा कावळा पहायला मिळाला. कावळ्याचा रंग पांढरा असल्यामुळे हा कावळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. एकूणच पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिल्यानंतर नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
दोन वर्षांपूर्वीही आढळला होता पांढरा कावळा
काळ्या कावळ्यांच्या समूहामध्ये अशा प्रकारचा पांढरा कावळा दिसल्यावर साहजिकच आश्चर्य वाटण्यासारखी बाब आहे. या आधीही दोन वर्षांपूर्वी शिरूर भागामध्ये अशा प्रकारचा कावळा लोकांच्या दृष्टीस पडला होता. पांढरा कावळा पाहिल्यानंतर परिसरातील नागरिक या कावळ्याचे छायाचित्र घेत आहेत.
तुमच्या शहरातून (पुणे)
काळा कावळा तर आपण रोजच पहातो पण पुण्यात चक्का पांढरा कावळा आढळून आल्यानं, हा कावळा चर्चेचा विषय बनला आहे pic.twitter.com/e46xLhAUx9
— News18Lokmat (@News18lokmat) April 10, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.