पुणे, 12 मे : पुण्यात कात्रज कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघातात पती पत्नी जागीच ठार झाले आहेत. इस्कॉन मंदिरासमोर असणाऱ्या चौकाजवळील आरएमडी शाळेजवळ हा अपघात झाला. शुक्रवारी सकाळी साडेसातला झालेल्या या अपघातात दाम्पत्याचाा मृत्यू झाला. दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर वाल्मिक लवांडे (वय ५०, रा. बाणेर गाव, पुणे) आणि उषा ज्ञानेश्वर लवांडे (वय ४५) हे दोघेही बाणेरवरून कोथळे पुरंदरकडे निघाले होते. एका नातेवाईकाच्या उत्तरकार्यासाठी ते निघाले होते. तेव्हा इस्कॉन मंदिरासमोरील चौकात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानतंर घटनास्थळी कोंढवा पोलिस दाखल झाले. अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे.
काँग्रेस नेत्यावर गोळीबार, कारमध्ये दबा धरून बसले होते हल्लेखोर; घटना CCTVत कैद
तुमच्या शहरातून (पुणे)
सेप्टिक टँक स्वच्छ करायला गेले पण मृतेदहच बाहेर निघाले, पाच मजुरांचा मृत्यू; परभणीतील घटना
परभणीत सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. पाच मजुरांच्या मृत्यूच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, परभणीतील सोनपेठ तालुक्यातल्या भाऊचा तांडा शिवारात ही घटना घडली. मारूती राठोड यांच्या शेतात सेप्टिक टँकची स्वच्छता करण्यासाठी रात्री मजूर आले होते. ते स्वच्छता करायला टाकीत उतरले पण बाहेर आलेच नाहीत. रात्रीच्या अंधारामुळे हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.