पुणे, 7 एप्रिल : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. भाजप आणि मविआकडून या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आता उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. भाजपकडून सध्या या पोटनिवडणुकीसाठी तीन नावांची चर्चा आहे. त्यामध्ये गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाचा समावेश आहे. यावर आता संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले काकडे?
पुणे लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणूक उमेदवारांच्या शर्यतीमध्ये भाजपचे संजय काकडे यांचं देखील नाव आहे. यावर संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत पक्ष जी जबाबदारी देईल ती घ्यायला तयार आहे. उमेदवारीसाठी सगळेच इच्छूक असतात मी पण इच्छूक आहे. मात्र पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच मी काम करणार. पक्ष सर्व्हे करेल त्यात ज्याला पसंती भेटेल त्याचं नाव केंद्रीय समितीकडून जाहीर करण्यात येईल असं संजय काकडे यांनी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
मविआकडून कोणाची चर्चा?
दरम्यान मविआकडून पुणे पोटनिवडणुकीसाठी आमदार रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांच्या नावाची चर्चा आहे. भाजप कोणाला उमेदवारी देणार यावरून मविआचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.