पुणे, 15 एप्रिल : पुण्यातील लोहगाव इथं गैरसमजातून टोळक्याने एका तरुणावर वार केल्याची घटना घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. गुन्हे शाखेच्या युनिट चारने या प्रकरणी टोळीला अटक केली असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शंतनू शिवराज चाटेसह अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर दिलीप बाबुराव हांगे हा फरार झाला आहे. टोळीने केलेल्या हल्ल्यात अमितकुमार विश्वकर्मा हा तरुण मृत्यूमुखी पडला.
BMWच्या स्पोर्ट्स बाईकवरून जाताना भीषण अपघात, दोन मित्रांचा जागीच मृत्यू
तुमच्या शहरातून (पुणे)
लोहगावमध्ये रस्त्यावरून चालला असताना अमित कुमारने चार-पाच जणांना भांडताना पाहिलं. भांडणाला घाबरून अमितकुमार तिथून पळून निघाला होता. तेव्हा शंतनूसह इतरांना त्यानं भांडण सोडवल्याचा गैरसमज झाला. याच गैरसमजातून टोळक्याने अमितकुमारचा पाठलाग करून त्याच्यावर वार केले.
पोलिसांनी लोहगाव परिसरातून अमितकुमारवर वार करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर अमितकुमारने गाडी आडवी केल्यानं त्याच्यावर वार केले असं त्यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. आता या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.