पुणे, 06 मे : पुण्यात वाघालोती मंडप साहित्याच्या गोडाऊनला आग लागून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. वाघोलीत उबाळे नगर परिसरात कवडे वस्तीत मंडप साहित्याचे गोडाऊन आहे. याला काल रात्री पावणे बाराच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणल्यानंतर गोडाऊनमधून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचं सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास गोडाऊनला भीषण आग लागली. यावेळी चार ते पाच सिलिंडरचा स्फोटही झाला. गोडाऊनमध्ये मंडप साहित्य होते. त्यामध्ये कुशन आणि कारपेटमुळे आगीने रौद्ररुप धारण केलं. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या होत्या. जवळपास तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
ऑनलाइन गेममध्ये गमावले पैसे, तरुणाने तलावात उडी मारून संपवलं जीवन; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
तुमच्या शहरातून (पुणे)
दरम्यान, गोडाऊनला लागलेल्या आगीत तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. गोडाऊनच्या मागील बाजूस इंडेन गॅसचे गोडाऊन होते. आग तिकडे पसरू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली गेली. तसंच रहिवाशी इमारतींना आगीची झळ पोहोचू नये याचीही काळजी घेण्यात आली. रहिवाशांना तात्पुरते सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले.
अग्निशमन दलाच्या 9 गाड्या आणि 45 जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमध्ये गोडाऊनमध्ये काम करणारे तीन कर्मचारी मृत्यूमुखी पडले. मृतांची नावे समजू शकली नाहीत. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी पहाटेचे चार वाजले. अद्यापही कुलिंगचे काम सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.