गणेश दुडम, प्रतिनिधी
17 एप्रिल : पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्यांना आता चाप बसला आहे. हलक्या वाहनांसाठी ताशी 100 किमी तर अवजड वाहनांना ताशी 80 किमीची मर्यादा दिली आहे. तरीही चालक वेग मर्यादेचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे अनेकदा निदर्शनास आलेले आहे. या वाहनचालकांना चाप बसण्यासाठी पिंपरी-चिंचवड आरटीओकडून डिसेंबरपासून मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर ठिकठिकाणी स्पीडगन लावण्यात आल्या आहेत. एक डिसेंबरपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या पाच महिन्यात पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर सर्वात जास्त स्पीड हा ताशी 180 किलोमीटर इतका मोजण्यात आला आहे.
त्या खालोखाल ताशी 160 किलोमीटर आणि ताशी 142 किलोमीटर इतका मोजण्यात आला आहे. सर्वाधिक स्पीड असणाऱ्या गाड्यांमध्ये सर्व गाड्या या आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांना ऑनलाईन पद्धतीने दंड पाठविण्यात आला आहे. मात्र, वंदे भारत एक्सप्रेस पेक्षाही जास्त वेगाने पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वहाने जात असल्याचे निर्दशनास आले आहे. परंतु, प्रत्येक गाडीवर आरटीओची करडी नजर असल्याने पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्याच्या वेगावर आता मर्यादा आल्या आहेत.
तुमच्या शहरातून (पुणे)
वाचा – अजितदादांनी उडवला धुरळा, ‘मातोश्री’वरही तापलं वातावरण, दिल्लीतला मोठा नेता भेटीला!
डिसेंबर 2022 ते मार्च 2023 दरम्यानची कारवाई
ओव्हरस्पीड : 2682
लेन कटिंग : 1556
विदाउट सीट बेल्ट : 2128
व्राँग साइड पार्किंग : 347
मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगतीवर वाहन चालवताना वेग मर्यादा पाळणे तितकंच महत्वाचं आहे. आपल्यासोबत इतर वाहन चालकांच्या जीवाशी खेळ होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेणं तितकंच घरजेचं आहे. परंतु, आरटीओची करडी नजर आणि दंडात्मक कारवाईने वाहन चालकांन मध्ये सुधारणा व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून चोवीस तास मुंबई प्रादेशिक परिवहन अंतर्गत येणाऱ्या पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक कर्मचारी डोळ्यात तेल घालून वाहन चालकांवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे थोडा फार वाहन चालकांना चाप बसून अपघात होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.