गोविंद वाकडे, प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड, 15 मे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवड मधील विकास कामांच्या उद्घाटनासाठी आलेले असताना जिल्हे शिवनेरी अशा नावाने नवीन जिल्हा स्थापन करण्याची मागणी करत भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी खळबळ उडवून दिली. लांडगे यांनी जाहीरपने अशी मागणी केल्याने व्यासपीठावर उपस्थित असलेले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची जरा कोंडीच झाली. मात्र, आपण करत असलेली मागणी ही राजकीय स्वार्थापोटी नाही तर नागरिकांच्या सोयीसाठी आणि वकास कामांना गती मिळावी यासाठी करत असल्याची सारवासारव लांडगे यांनी लगेच केली. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी लांडगे यांची येथेच्छ फिरकी घेत बरं झालं तुम्ही मुबईचा समुद्र मागितला नाही अशी टर उडवली.
लांडगे यांचा सवता सुभा?
तुमच्या शहरातून (पुणे)
आता चंद्रकांत पाटील आणि आमदार महेश लांडगे यांच्यात शित युद्ध सुरू असल्याचं सर्व श्रुत आहे. त्यामुळे नव्या जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची लांडगे यांची राजकीय मनसा असल्याने ते अशी मागणी करत असल्याचं मत राजकीय विश्लेषकानी व्यक्त केलंय तर शिवेनरी असं भावनीक नावं देऊन स्वतःला नेता म्हणून मिरविण्यासाठी त्याचं बरोबर आगामी काळात होणाऱ्या शिरूर लोकसभेची निवडणूक लांडगे यांना लढवायची असल्याने ते आपल्यासाठी सवता सुभा तयार करत असल्याची टीका करत राष्ट्रवादीने पुणे जिल्ह्याच्या विभाजनाला तीव्र विरोध केला आहे.
वाचा – Pune News : खडकवासला धरणात दोन मुली बुडाल्या, 7 जणींना वाचवण्यात यश
खरंतर कोणताही नवा जिल्हा निर्माण करण्यासाठी लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थितीचा सर्वात आधी विचार केला जातो. त्यानुसार पुणे जिल्हाचा भौगोलिक आणि लोकसंख्येचा विस्तार वाढतो आहे हे जरी खरे असले तरी लगेचच नवा जिल्ह्याची निर्मिती करावी एव्हढा प्रशासनावर बोजा नाही हे देखील खरं आहे. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्याचा सरकार विचार करते का हे पहावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.