वैभव सोनवणे, पुणे, 18 एप्रिल : पुण्यात एका शाळेचे दोन मजले सील करून पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एनआयला अशी माहिती मिळाली होती की, पुण्यातल्या अश्रफनगर रोड भागातील ब्यू बेल शाळेत दहशतवादी कारवाया सुरू आहेत. पीएफआय या संघटनेकडून दहशतवादी कारवायांसाठी इथं प्रशिक्षण दिलं जात असल्याचा आरोप आहे. या संशयावरूनच एनआयएकडून शाळेचे दोन्ही मजले सील करण्यात आले आहेत.
एनआयएने रविवारी ही कारवाई केली. यामध्ये ब्यू बेल शाळेचा चौथा आणि पाचवा मजला सील केला आहे. दहशतवादी कारवायांच्या तयारीसाठी पीएफआयकडून या मजल्याचा वापर केला जात असल्याचा ठपका एनआयएने ठेवला आहे. पीएफआयकडून मुस्लिम तरुणांची भरती केली जात होती आणि २०४७ पर्यंत इस्लामिक राजवट स्थापन करण्यास विरोध करतात त्यांच्याविरोधात कारवायांसाठी प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येत होतं असा दावा एनआयएकडून करण्यात आला आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
महाराष्ट्रात वादळी पावसाचे पुन्हा सर्जीकल स्ट्राईक, कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र
गेल्या वर्षी एनआयएकडून पुण्यातील ब्यू बेल शाळेच्या दोन्ही मजल्यांची झडती घेण्यात आली होती. तेव्हा काही कागदपत्रेही जप्त केली गेली होती. एनआयएने पीएफआय संघटनेच्या विरोधात केलेल्या कारवाईत पुण्याच्या कोंढवा परिसरातील एका शाळेच्या दोन मजल्यांना सील केलं आहे. इथून दहशतवादी कारवायांसाठी रिक्रूटमेंट, शस्त्रास्त्र चालवण्याचं ट्रेनिंग दिलं जात होत असं एनआयए ने १८ मार्चला न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.