नीलम कराळे, प्रतिनिधी
पुणे, 3 एप्रिल : पुण्यामध्ये जंगली महाराज रस्त्यावरती श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये महावेल आहे. ही महावेल येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांना आकर्षित करत असते. या महावेल सोबत अनेक नागरिक फोटो सुद्धा काढतात. पुणे सारख्या शहरी भागामध्ये ही महावेल सहसा पाहायला मिळत नाही. त्यामुळे या महावेल संदर्भात वृक्ष अभ्यासक शास्त्रज्ञ डॉक्टर सचिन अनिल पुणेकर यांनी आपल्याला माहिती सांगितली आहे.
मोठा हरित वारसा
तुमच्या शहरातून (पुणे)
ही वेल चांबुक, कांचनवेल या नावाने आपल्या येथे सुप्रसिद्ध आहे. तर ही बहुनिया व्हालाय लॅम्युनिसी या वेलींच्या जाती मधली वेल असून या वेलीला व्युडी लायनाझ, व्युडी क्लाइम्बर म्हणजेच महावेल अथवा राक्षसीवेल संबोधले जाते. ही वेल म्हणजेच आपल्या भारतातील मोठा हरित वारसा आहे. ह्या वेलीमुळे खरंतर मोठमोठ्या जंगलांचे जतन होते. ह्याला जंगल बाइंडिंग करणारी वेल देखील म्हणून ओळखले जाते. ही भारतामध्ये मुख्यत्वे सातपुडा, विदर्भ, ताडोबा, कोकण, ठाणे आधी निबीड अरण्यामध्ये आढळते. ही निम सदाहरित वनांमध्ये आढळणारी वेल आहे.
ही वेल पुणे शहरासारख्या शहरी भागामध्ये सहसा मिळत नाही. ही वेल सध्या पुण्यातील श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यानात आहे. इथे 400 वर्षांपूर्वी मुळा नदीच्या पात्रातून वाहून आलेले बीज असू शकेल किंवा 400 वर्षांपूर्वी कुणीतरी हे बीज लावले असेल आणि या बिजाची ही महावेल तयार झालेली आहे, अशी माहिती सचिन पुणेकर यांनी दिली.
वेलीचे संवर्धन गरजेचे
या सोबतच सध्या या वेलीचे संवर्धन करणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. कारण की काही ठिकाणी ही वेल तुटली असून यामुळे संपूर्ण वेलीलाच मोठ्या प्रमाणावर धोका बसला आहे. तसेच या वेलीच्या कडेने बांधलेल्या कठड्यामुळे देखील वेलीला आपली मूळ पसरवण्यासाठी जागा मिळत नाही आहे. ही वेल दुर्लक्ष झाली असून फक्त सुशोभणासाठी ह्या बागेमध्ये दिसत आहे. याकडे पुणे महानगरपालिका आणि वर वृक्ष प्राधिकरणाने लक्ष घालणे गरजेचे आहे, असे देखील यावेळेस सचिन पुणेकर यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.