पुणे, 21 एप्रिल : गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र आता पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये लागलेले पोस्टर.
पोस्टरची चर्चा
अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर पडदा पडला आहे. मात्र एका उत्साही कार्यकर्त्याने पिंपरी चिंचवड शहरात दादा आम्ही तुमच्यासोबत आज, उद्या आणि सदैव आसा मजकूर असलेलं होर्डिंग्ज लावले आहेत. विशेष म्हणजे या होर्डिंग्जवर राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख आणि शरद पवार यांचा फोटो नाहीये. एका माजी नगरसेवकाने हे बॅनर लावल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये लावण्यात आलेले हे होर्डिंग्ज चर्चेचा विषय बनले आहेत.
तुमच्या शहरातून (पुणे)
काय म्हटलं होतं अजित पवारांनी?
अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर मंगळवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीतमध्येच राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. तसेच या बातम्या मुद्दाम पेरल्या जात असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.