पुणे, 21 एप्रिल : ठाकरे गटातून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. आता आणखी एक मोठा धक्का शिंदे गटाने ठाकरे गटला दिला आहे. ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेब चांदेरे यांच्यासह अनेकजण शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यापूर्वी रमेश कोंडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता चांदेरे हे देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्यानं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
उमेदवारीसाठी इच्छूक
ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे हे भोर विधानसभा लढण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक एकत्र लढल्यास हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जातो. त्यामुळे बाळासाहेब चांदेरे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. चांदेरे यांच्यासोबतच भोर वेल्हा मुळशी भागातील अनेक जण ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
तुमच्या शहरातून (पुणे)
कल्याणमध्येही धक्का
दरम्यान शिंदे गटाने कल्याणमध्येही ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. कल्याणमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.